Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Bombay in New York: आता अमेरिकेत वाजणार आयआयटी बॉम्बेचा डंका! न्यूयॉर्कमध्ये सब-कैंपससाठी झाला सामंजस्य करार

IIT Bombay in New York: आयआयटी बॉम्बे आता थेट अमेरिकेतून चालवणार शैक्षणिक अभ्यासक्रम? न्यूयॉर्कच्या 'SUNY' विद्यापीठासोबत झालेल्या या ऐतिहासिक कराराचा भारतीय विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल? जाणून घ्या सविस्तर.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 27, 2026 | 04:02 PM
iit bombay

iit bombay

Follow Us
Follow Us:

IIT Bombay In New York Sub Campus University: भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बेने पहिल्यांदाच अमेरिकेत आपला शैक्षणिक सब-कैंपस स्थापन करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी आयआयटी बॉम्बे आणि अमेरिकेतील ‘स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क’ (SUNY) च्या ओल्ड वेस्टबरी कैंपस यांच्यात एका आशय पत्रावर (Letter of Intent – LoI) स्वाक्षरी करण्यात आली आहे. हा करार न्यूयॉर्कच्या लॉंग आयलंड येथील ‘SUNY ओल्ड वेस्टबरी’ परिसरात विज्ञान, अभियांत्रिकी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान (Emerging Technologies) या क्षेत्रांमध्ये नवीन शैक्षणिक कार्यक्रम आणि संशोधनाच्या संधी विकसित करण्यासाठी करण्यात आला आहे. या प्रसंगी न्यूयॉर्कमधील भारताचे महावाणिज्य दूत बिनाय प्रधान देखील उपस्थित होते.

प्रस्तावित आयआयटी बॉम्बे सब-कैंपसचा मुख्य भर विज्ञान, अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इतर प्रगत तंत्रज्ञानावर असेल. दोन्ही संस्था मिळून पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन कार्यक्रम तयार करतील. याशिवाय फॅकल्टी एक्सचेंज, संशोधकांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन प्रकल्प, शैक्षणिक परिषदा आणि ज्ञान सामायिक करण्याचे उपक्रमही सुरू केले जातील. यामुळे भारतीय आणि अमेरिकन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकण्याची आणि संशोधन करण्याची संधी मिळणार आहे.

सरकार आणि आयआयटीने काय म्हटले?

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या भागीदारीला भारत-अमेरिका शैक्षणिक संबंधांमधील एक ऐतिहासिक कामगिरी म्हटले आहे. ते म्हणाले की, “यामुळे भारताच्या संशोधन संस्कृतीला बळ मिळेल, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी नवीन संधी निर्माण होतील आणि दोन्ही देशांमधील ज्ञानावर आधारित सहकार्य अधिक मजबूत होईल.”

Bullet Train Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! NHSRCL मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाईन अर्ज

आयआयटी बॉम्बेचे संचालक प्राध्यापक शिरीष केदारे म्हणाले की, “SUNY ओल्ड वेस्टबरी ही दर्जेदार शिक्षण आणि दूरदर्शी विचार असणारी संस्था आहे. दोन्ही संस्थांचे कौशल्य एकमेकांना पूरक आहे, ज्यामुळे ही भागीदारी येत्या काही वर्षांत खूप पुढे जाऊ शकते.

ही भागीदारी का विशेष आहे?

अमेरिकेतील आयआयटी बॉम्बेचा हा पहिलाच शैक्षणिक सब-कैंपस असेल आणि भारतीय उच्च शिक्षणाच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च शिक्षण सचिव डॉ. विनीत जोशी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा हे देखील व्हर्च्युअली उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या मते, हा उपक्रम भारत आणि अमेरिका यांच्यातील उच्च शिक्षण, विज्ञान आणि संशोधन सहकार्याला एका नवीन उंचीवर घेऊन जाईल.

NEET Re Exam Result: नीट विद्यार्थ्यांसाठी मोठी गूड न्यूज! Answer Key मध्ये एक प्रश्न ‘ड्रॉप’, सर्व उमेदवारांना मिळणार बोनस गुण

तज्ज्ञांच्या मते, या भागीदारीमुळे भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन सुविधा, जागतिक नेटवर्क, फॅकल्टी सहकार्य आणि नवीन तंत्रज्ञानावर काम करण्याच्या अधिक संधी मिळतील. तसेच भारतीय संस्थांची जागतिक ओळख मजबूत करण्याच्या दृष्टीनेही हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

Web Title: Iit bombay in new york sub campus suny old westbury loi signed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • education
  • IIT Bombay
  • New York city

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा
2

IIT बॉम्बे विद्यार्थी मृत्यू प्रकरण; परीक्षा हॉल ते हॉस्टेलदरम्यान साहिल कुठे होता? iPhone 17 मधील डेटा ठरू शकतो महत्त्वाचा

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
3

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
4

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.