फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Bullet Train Jobs: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात काम करण्याचे जर तुमचे स्वप्न असेल किंवा तुम्ही अशा सरकारी नोकरीच्या शोधात आहात का, जिथे उत्तम पगारासोबतच देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा भाग होण्याची संधी मिळेल. तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) विविध पदांवर भरतीसाठी जाहीर केली आहे.
निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार दरमहा ४०,००० ते १.२५ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. याशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सेवा-सुविधांचा लाभ मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या भरती प्रक्रियेतील पात्रता निकष व अटी काय आहेत ?
NHSRCL च्या या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २२४ पदांपैकी २०९ पदे नॉन-एग्झिक्युटिव्ह (Non-Executive) आणि १५ पदे एग्झिक्युटिव्ह (Executive) श्रेणीतील आहेत. यामध्ये अनेक तांत्रिक (Technical) आणि परिचालन (Operational) पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ज्यामध्ये प्रामुख्याने ज्युनियर इंजिनिअर, स्टेशन मॅनेजर, ट्रेन मॅनेजर, ऑपरेशन कंट्रोलर, आयटी (IT) विभाग आणि सुरक्षा विभागातील पदे, इतर एग्झिक्युटिव्ह आणि नॉन-एग्झिक्युटिव्ह पदांचा समावेश आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना भारताच्या पहिल्या हाय-स्पीड रेल प्रकल्पात काम करण्याची आणि देशाच्या आधुनिक रेल्वे नेटवर्कच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळेल.
या भरती मोहिमेअंतर्गत २०९ नॉन-एग्झिक्युटिव्ह आणि १५ एग्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज प्रक्रिया १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १४ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना NHSRCL च्या www.nhsrcl.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश तांत्रिक पदांसाठी उमेदवारांकडे संबंधित ट्रेड किंवा विषयातील डिप्लोमा (Diploma), बीई (BE) किंवा बीटेक (BTech) पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, काही विशेष पदांसाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.
वयोमर्यादेचा विचार केल्यास, उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तथापि, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) आणि इतर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. अधिक माहिती किंवा इतर अपडेट्ससाठी उमेदवार NHSRCL च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.






