Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Madras : इंजिनिअरिंगसाठी प्रसिद्ध असलेली IIT मद्रास आता ‘या’ क्षेत्रात टाकणार पाऊल; जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

IIT Madras : इंजिनिअरिंगसाठी ओळखली जाणारी IIT मद्रास आता वैद्यकीय क्षेत्रात उतरत आहे. आता 'स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस' या संस्थेत सुरू होणार असून भविष्यात ही संस्था डॉक्टर घडवण्याची तयारी करत आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 20, 2026 | 02:47 PM
iit madras

iit madras

Follow Us
Follow Us:

IIT Madras : गेल्या ७ दशकं केवळ अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग), तंत्रज्ञान आणि संशोधन यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘IIT मद्रास’च्या प्रतिमेत आता मोठा बदल होत आहे. आजवर इंजिनिअरिंगसाठी ओळखली जाणारी ही संस्था आता डॉक्टर तयार करण्याची तयारी करत आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी आयआयटी मद्रास सज्ज झाले असून, यासाठी ‘स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस’ ची सुरुवात केली जाणार आहे. येथे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतील. एका एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रो. कामकोटी त्यांनी सांगितले की, आयआयटी मद्रास ‘स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस’ सुरू करेल आणि येथून विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्या मिळवता येतील.

प्रो. कामकोटी यांनी काय सांगितले?

आयआयटी मद्रासचे प्रो. कामकोटी यांनी स्पष्ट केले की, संस्था वैद्यकीय क्षेत्रात अगदीच नवीन सुरुवात करत नाही; यापूर्वीच मे २०२३ मध्ये संस्थेने ‘वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची’ सुरुवात केली होती. या उपक्रमासह हा भारताचा पहिलाच विभाग ठरला होता. आता चार वर्षांच्या अंडरग्रॅजुएट पदवीच्या वैद्यकीय शिक्षणाची सुविधा दिली जाईल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना हायब्रिड ग्रॅजुएट म्हणून तयार केले जाते. त्यांनी सांगितले की, या पदवींमध्ये अंडरग्रॅजुएट (MBBS), पोस्टग्रॅजुएट (MD) आणि डॉक्टोरल (PhD) यांचा समावेश असेल.

Lost Marksheet : १० वी-१२ वीची मार्कशीट हरवली? आता घाबरू नका, या सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच मिळवा

शिक्षणमंत्र्यांचीही आयआयटी संचालकांशी भेट

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्हीझीनाथन कामकोटी यांची भेट घेतली, ज्याचे फोटो त्यांनी ‘एक्स’ (X) वर शेअर केले आहेत. दोन फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “आयआयटी मद्रासच्या संचालकांना भेटून आनंद झाला.” पुढे त्यांनी लिहिले की, ‘आयआयटी मद्रास शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाच्या क्षेत्रात सतत नवीन उच्चांक गाठत आहे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रमुख संस्था म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. संस्थेची उत्कृष्ट कामगिरी आणि भारताच्या ‘नॅलेज इकोसिस्टम’मधील योगदानास नवीन उंचीवर नेण्यासाठी प्रो. कामकोटी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो.’

तंत्रज्ञान संस्था डॉक्टर का बनवू इच्छित आहे?

आयआयटी मद्रासचे संचालक प्रो. व्हीझीनाथन कामकोटी यांच्या मते, तांत्रिक संस्थांना आता मेडिकल स्कूल सुरू करण्याची तीव्र गरज आहे. यामागील मुख्य कारण सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, कोरोना महामारीनंतर आधुनिक वैद्यकीय शास्त्र पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून झाले आहे. अशा परिस्थितीत, जीवनरक्षक तंत्रज्ञानासाठी कोणत्याही देशाने परदेशावर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. म्हणूनच भारताला इतर देशांकडून तंत्रज्ञान विकत घेण्याऐवजी, ते स्वतःच्या देशातच विकसित करावे लागेल.

Sindhudurg DCC Bank : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांची भरती; आजपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू!

आयआयटी मद्रासचा हा उपक्रम केवळ पारंपरिक डॉक्टर तयार करण्यासाठी नाही, तर मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञान एकाच मंचावर आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आजच्या काळात आजारांवर अचूक उपचारासाठी एमआरआय (MRI), प्रगत वैद्यकीय इमेजिंग सिस्टीम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक सर्जरी आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांचे महत्त्व वेगाने वाढले आहे. अशा वेळी हेल्थकेअर सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंगचा मेळ घालणे अत्यंत गरजेचे बनले आहे. आयआयटीच्या या पाऊलमुळे देशाचे वैद्यकीय क्षेत्र तांत्रिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि आत्मनिर्भर होईल.

Web Title: Iit madras school of medical sciences mbbs marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Engineering
  • IIT

संबंधित बातम्या

IIT Campus : आयआयटीचा परदेशात डंका! ‘या’ देशाच्या भूमीवर भारताचा पहिला तंत्रज्ञान कॅम्पस सुरू होणार..
1

IIT Campus : आयआयटीचा परदेशात डंका! ‘या’ देशाच्या भूमीवर भारताचा पहिला तंत्रज्ञान कॅम्पस सुरू होणार..

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..
2

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कंपन्यांना IIT चा दणका! जॉब ऑफर्स परत घेणाऱ्या ‘या’ कंपन्यांसोबत संपवले सर्व संबंध..

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!
3

GATE 2027 अर्जाची अंतिम मुदत उद्याच; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तातडीने भरा फॉर्म!

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
4

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.