Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी

GDS Result 2026: इंडिया पोस्ट GDS भरतीची पहिली मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV-1, DV-2), मेडिकल आणि ट्रेनिंगची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 13, 2026 | 01:28 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

GDS Result 2026: इंडिया पोस्टने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची मेरिट लिस्ट जाहीर केली आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या यादीत नाव आल्यास, न थांबता त्वरित पुढील तयारी सुरू करा. इंडिया पोस्ट जीडीएस भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जात नाही. ही सरकारी नोकरी विशेषतः १० वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतरच खरी प्रक्रिया सुरू होते. याविषयीचे सर्व अपडेट्स iapost.gov.in/gdsonlineengagement या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.

माहितीच्या अभावामुळे अनेक उमेदवारांना मेरिट लिस्ट नंतरची प्रक्रिया समजत नाही. एका छोट्या चुकीमुळे किंवा कागदपत्रांमधील गडबडीमुळे अनेकदा निवड झालेल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द केले जातात. म्हणूनच पहिली मेरिट लिस्ट आल्यावर आनंद साजरा करण्यासोबतच पुढील टप्प्यांच्या तयारीला लागणे अत्यंत गरजेचे आहे. इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यापासून ते पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV-1), ट्रेनिंग आणि फायनल जॉइनिंग लेटर मिळेपर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा असतो, हे जाणून घ्या.

इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक मेरिट लिस्ट आऊट

भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक भरती २०२६ ची पहिली मेरिट लिस्ट indiapostgdsonline.gov.in वर जारी केली आहे. याद्वारे एकूण २३,७५७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमच्या राज्य किंवा सर्कलची मेरिट लिस्ट डाऊनलोड करू शकता. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या सूचीमध्ये Ctrl+F हा शॉर्टकट वापरून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा नाव, मिळालेले पद, डिव्हिजन आणि १० वीची टक्क्यांनुसार माहिती पाहू शकता.

निवड झालेल्या उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्रांसह संबंधित विभागीय कार्यालयात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. इंडिया पोस्ट जीडीएस मेरिट लिस्टमध्ये प्रत्येक उमेदवाराच्या नावापुढे त्याच्या संबंधित डिव्हिजनल हेडचे नाव आणि व्हेरिफिकेशन करून घेण्याची अंतिम तारीख लिहिलेली असते. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेलवरही इंटिमेशन मेसेज येतो.

वेळेच्या मर्यादेची काळजी घ्या: पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह निर्धारित विभागीय कार्यालयात रिपोर्ट करण्यासाठी १० ते १५ दिवसांचा वेळ मिळतो.

या राऊंडमध्ये काय होते?: अर्ज फॉर्ममध्ये भरलेले गुण आणि माहितीची खरी मार्कशीट आणि प्रमाणपत्रांशी पडताळणी केली जाते. सर्व कागदपत्रे अचूक आढळल्यास प्रोव्हिजनल व्हेरिफिकेशन स्लिप दिली जाते.

पायरी २: आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट

व्हेरिफिकेशन सेंटरवर जाताना कोणतीही घाईगडबड होऊ नये म्हणून आपले सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह त्यांच्या प्रत्येकी २ झेरॉक्स कॉपी  सोबत ठेवा:

  • १० वी ची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
  • जात प्रमाणपत्र (ओबीसी/एससी/एसटी/ईडब्ल्यूएससाठी केंद्र सरकारच्या फॉरमॅटनुसार).
  • पीडब्ल्यूडी .
  • ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी).
  • निवास प्रमाणपत्र (Domicile/Residential Certificate).
  • कॉम्प्युटर नॉलेज सर्टिफिकेट (स्वतंत्र असल्यास, अन्यथा १० वी मध्ये विषय असल्याटर सूट मिळते).
  • कम्युनिटी/स्थानिक भाषेचे ज्ञान प्रमाणपत्र (१० वी मध्ये शिकलेली भाषा).
  • नुकताच काढलेला पासपोर्ट साईज रंगीत फोटो (किमान ६ ते ८ कॉइज).
AISHE Report: उच्च शिक्षणात भारतीय मुलींची ऐतिहासिक झेप! प्रवेशांमध्ये ४२.२% ची मोठी वाढ; मुलांपेक्षा मुली पुन्हा एकदा आघाडीवर

पायरी ३: दुसरे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन (DV-2)

अनेक उमेदवारांना हे माहीत नसते की डाक विभागात दोनदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. पहिले व्हेरिफिकेशन (DV-1) ही फक्त प्राथमिक तपासणी असते. DV-1 क्लिअर झाल्यानंतर काही दिवसांनी DV-2 साठी बोलावले जाते.

खोलवर तपासणी: या टप्प्यात कागदपत्रांची पार्श्वभूमी तपासणी केली जाते. १० वी ची मार्कशीट खरी आहे की खोटी, हे तपासण्यासाठी ती संबंधित शिक्षण बोर्डाकडे पाठवली जाते.

पोलिसांची पडताळणी आणि मेडिकल: याच दरम्यान पोलिसांकडून पडताळणीचा फॉर्म भरून घेतला जातो आणि कोणत्याही सरकारी हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसरकडून (CMO) मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बनवण्याचे निर्देश दिले जातात.

Admission Scam: डोळे निरोगी, पाय धडधाकट; तरीही बनवले ‘दिव्यांग’ प्रमाणपत्र! दून मेडिकल कॉलेजमध्ये MBBS प्रवेशाचा मोठा बनाव उघड

पायरी ४: सिस्टीम ट्रेनिंग आणि फायनल अलॉटमेंट लेटर

दोन्ही टप्प्यांचे व्हेरिफिकेशन आणि मेडिकल क्लिअरन्स झाल्यानंतर उमेदवारांना ५ ते १५ दिवसांच्या प्रॅक्टिकल आणि सिस्टीम ट्रेनिंगसाठी पाठवले जाते. जर ब्रांच पोस्टमास्टर (BPM) पदासाठी निवड झाली असेल, तर ‘DARPAN’ डिव्हाइस चालवणे, टपाल व्यवहार, खाते उघडणे आणि पैसे जमा-काढणी करण्याचे डिजिटल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभाग फॉर्मल जॉइनिंग म्हणजेच अलॉटमेंट लेटर देतो. त्यानंतर तात्काळ, वाटप केलेल्या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये (BO) किंवा सब पोस्ट ऑफिसमध्ये (SO) जाऊन कार्यभार स्वीकारावा लागतो.

Web Title: India post merit list document verification process gds result 2026 sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Government Job
  • India Post
  • Interview for Jobs

संबंधित बातम्या

United Nations मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या आवश्यक कौशल्ये आणि अर्ज प्रक्रिया..
1

United Nations मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या आवश्यक कौशल्ये आणि अर्ज प्रक्रिया..

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
2

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!
3

Agniveer Retirement Updates: अग्निवीरांसाठी खूशखबर! चार वर्षांच्या सेवाकाळानंतर सरकारकडून पुनर्वसनाची जय्यत तयारी!

World Post Day: ‘स्मार्टफोन’च्या युगातही अबाधित आहे पुण्याच्या ऐतिहासिक टपाल इमारतीचा रुबाब
4

World Post Day: ‘स्मार्टफोन’च्या युगातही अबाधित आहे पुण्याच्या ऐतिहासिक टपाल इमारतीचा रुबाब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.