
sugar
Sugar Export Ban 2026: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत साखरेच्या निर्यातीवर सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा त्या पुढील आदेश येण्यापर्यंत बंदी घातली आहे. उत्पादनाबाबतची चिंता आणि देशाअंतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवणे हा त्यापाठीगचा उद्देश आहे. साखरेच्या उत्पादनात भारत जगात आघाडीवर असून जगातील अनेक देशांना इथूनच साखर निर्यात केली जाते. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या निर्यातीशी संबंधित काही महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
उत्तर : भारतातून प्रामुख्याने तीन प्रकारची साखर निर्यात केली जाते. ज्यामध्ये पांढरी साखर(White Sugar), रिफांइंड साखर(Refined Sugar) आणि कच्ची साखर (Raw Sugar) यांचा समावेश होतो.
उत्तर : AISTA च्या अहवालानुसार, २०२४-२५ मार्केटिंग हंगामात भारताने एकूण ७.७५ लाख टन साखरेची निर्यात केली. यामध्ये ६.१३ लाख टन पांढरी साखर, १.०४ लाख टन रिफांइंड साखर आणि ०.३३ लाख टन कच्ची साखर यांचा समावेश होतो.
उत्तर : श्रीलंका, सोमालिया, जिबूती आणि अफगाणिस्तान हे देश भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी करतात.
उत्तर : कापसानंतर साखर हा भारतातील दुसरा सर्वात मोठा कृषी उद्योग आहे. ऊस आणि साखर उद्योग मिळून सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेला आहे.
उत्तर : भारत हा जगातील साखरेचा सर्वात मोठा ग्राहक आहे. आपल्या देशात उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये साखरेचे उत्पादन सर्वाधिक होते.