फोटो सौजन्य - सोशल मीडिया
US OPT Crackdown: अमेरिकेत दीर्घकाळापासून सरकारच्या निशाण्यावर असलेला ‘ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग’(OPT) चा प्रोग्राम आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) ने या कार्यक्रमाविरोधात कारवाई सुरू केली आहे. या एचन्सीला अशा सुमारे १०,००० विदेशी विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे की, जे या प्रोग्रामअंतर्गत नोकरी करत आहेत. यात भारतीय विद्यार्थ्यांचा मोठा समावेश असण्याची शक्यता आहे. कारण ते या सुविधेचा मोठ्या संख्येने लाभ घेतात.
ICE संचालक टॉम एम. लिओन्स यांनी एजन्सीला अशा ओपीटी प्रोग्रामला ‘फसवणुकीचे केंद्र’ संबोधले आहे. तसेच ते म्हणाले की, त्यावेळी होमलँड सिक्युरिटी विभागाचा असा अंदाज होता की, या सुविधेचा केवळ काही हजारच विद्यार्थी लाभ घेत असतील. मात्र, आता ही व्यवस्था विदेशी कामगारांची एक पाइपलाइन बनली आहे.ज्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.
अमेरिकेत शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांना पदवीनंतर १२ महिने अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी मिळते,ज्याला OPT म्हणतात. तर सायन्स, टेक्नॉलॉची, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स (STEM) क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना STEM-OPT अंतर्गत आणखी 2 वर्षांची मुदतवाढ मिळते. आशा प्रकारे विदेशी विदयार्थी अमेरिकेत ३ वर्षे काम करू शकतात.
संचालकांच्या मते, बुश सरकारच्या काळात सुरू झालेल्या या प्रोग्रामचा जसा विस्तार झाला, तशी फसवणुकही वाढली. अनेक विद्यार्थी अशा कंपनीत काम करत असल्याचे दाखवले. ज्यांचे अस्तित्वच नाही. गेल्या आठवड्यात टेक्सासमधील १८ संशयास्पद कंपन्यांची तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. एका कंपनीत केवळ 3 विद्यार्थी काम करत असल्याचे सांगितले. मात्र, रेकॉर्डनुसार तिथे ५०० विदेशी विद्यार्थी होते.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता लातूरमध्ये? सराव परीक्षेतील ४२ प्रश्न जसेच्या तसे कसे आले?
ICE च्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द होण्याच्या मार्गावर आहेत किंवा त्यांना मायदेशी पाठवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी खालील खबरदारी घेणे गरजेचे आहे.






