फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) तर्फे देशभरातील उमेदवारांसाठी मोठी करिअरची संधी उपलब्ध झाली होती. IOCL ने अभियंता पदांसाठी भरतीची अधिसूचना ५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे अजूनही अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्जाची प्रक्रिया IOCL च्या अधिकृत संकेतस्थळावर iocl.com पूर्ण करता येईल. आज शेवटची तारीख आहे, त्यामुळे कसलाही उशीर न करता भरतीसाठी अर्ज करण्यात यावे.
या भरतीत एकूण १८५ अभियंता पदे भरण्यात येणार आहेत. ही नोकरी संपूर्ण भारतातील विविध प्रकल्पांमध्ये मिळणार आहे. उमेदवारांना भारतीय तेल क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
अर्ज शुल्क
पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते २६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयोमर्यादेचा हिशोब १ जुलै २०२५ रोजी केला जाईल. आरक्षण प्रवर्गानुसार शिथिलतेची तरतूद असेल.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रियेत पाच टप्पे असतील :
अर्ज कसा करावा?
IOCL मध्ये अभियंता म्हणून नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून ही संधी गमावू नये.