Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canada Education: कॅनडाची पदवी घेऊनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना? जाणून घ्या यामागचे नेमके वास्तव…

Canada Education System: कॅनडामध्ये शिक्षण पूर्ण करूनही भारतीय विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी का येत आहेत? जाणून घ्या पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिटचे (PGWP) नवे नियम आणि भारत-कॅनडाच्या शिक्षण पद्धतीमधील मोठा फरक.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 02, 2026 | 01:17 PM
canada

canada

Follow Us
Follow Us:

Reality of Canada Education & Jobs:  शिक्षणाचा विचार केला तर कॅनडा नेहमीच भारतीय विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीमध्ये राहिला आहे. सध्या तेथे ४ लाखांपेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बॅचलर्स, मास्टर्स, पीएचडी आणि डिप्लोमा यांसारखे अनेक कोर्सेस उपलब्ध असण्यासोबतच, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिथे काम करण्याची संधीही मिळते. मात्र, गेल्या काही काळापासून कॅनडात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

अशा परिस्थितीत, कॅनडाची पदवी खरोखरच विद्यार्थ्यांना नोकरीसाठी सक्षम बनवते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच प्रश्नाचे उत्तर कॅनडामध्ये शिक्षण घेतलेल्या सार्थक या भारतीय विद्यार्थ्याने स्वतःच्या अनुभवावरून दिले आहे.

PGWP (पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिट) चे नियम काय आहेत?

कॅनडामध्ये शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ‘पोस्ट-ग्रॅज्युएशन वर्क परमिट’ (PGWP) अंतर्गत काम करण्याची संधी मिळते. यासाठी विद्यार्थ्याचा कोर्स मान्यताप्राप्त डीएलआयमधून किमान ८ महिन्यांचा असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ‘CLB 7’ आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘CLB 5’ या पातळीचा भाषा स्कोअर (Language Score) अनिवार्य आहे.

कोर्स पूर्ण झाल्याचे अधिकृत पत्र मिळाल्यापासून १८० दिवसांच्या आत PGWP साठी अर्ज करावा लागतो. ८ महिने ते २ वर्षांपर्यंतच्या कोर्ससाठी तितक्याच कालावधीचे वर्क परमिट मिळते, तर मास्टर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल ३ वर्षांचे PGWP मिळू शकते. या परमिटच्या आधारे विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात नोकरी करू शकतात.

भारत आणि कॅनडाच्या शिक्षण पद्धतीत काय फरक आहे?

सार्थक ऑगस्ट २०२३ मध्ये कॅनडाला गेला होता. त्याने आधी ओंटारियो येथे बिझनेस मॅनेजमेंट आणि नंतर कोनेस्टोगा कॉलेजमधून ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट’चे शिक्षण घेतले. सध्या तो एका कंपनीत सिझनल टीम मेंबर म्हणून काम करत आहे.

Skills vs Degree Debate: मायक्रोसॉफ्टसाठी १९ वर्षांच्या तरुणानं आयआयटी का सोडलं? जाणून घ्या यामागचं नेमक कारण काय?

त्याच्या अनुभवानुसार, भारत आणि कॅनडामधील शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठा फरक आहे. भारतात शिक्षण अधिक पद्धतशीर आणि शिक्षकांवर केंद्रित असते, जिथे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे शिकवले जाते. याउलट, कॅनडामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः रिसर्च करणे, विषय समजून घेणे आणि क्लासरूमच्या बाहेरही शिकण्यासाठी पुढाकार घेतात.

कॅनडाची पदवी खरोखरच फायदेशीर आहे का?

सार्थकचे असे मत आहे की, जर एखादा विद्यार्थी केवळ परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करत असेल, तर त्याला कॅनडाच्या शिक्षण पद्धतीचा पूर्ण फायदा घेता येणार नाही. परंतु, जे विद्यार्थी नवीन कौशल्ये (Skills) शिकण्यास, विषय सखोल समजून घेण्यास आणि स्वतः मेहनत घेण्यास तयार असतात, त्यांना येथील प्राध्यापकांचे पूर्ण सहकार्य लाभते.

NEET 2026 Reforms: NEET परीक्षा आता अभ्यासक्रमानुसार वेगळी होणार? स्वतंत्र परीक्षेबाबत संसदीय समितीचा मोठा सल्ला काय?

कॅनडामधील बहुतांश कोर्सेस हे इंडस्ट्रीच्या गरजांनुसार डिझाईन केलेले असतात, पण यश त्याच विद्यार्थ्याला मिळते जो अभ्यासासोबतच आपल्या कौशल्यांवर आणि अनुभवावर सातत्याने काम करतो.

Web Title: Is canada education degree worth it indian students job struggle pgwp rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Canada
  • education
  • Skill Development

संबंधित बातम्या

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!
1

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!

JNVST Admission: अनेक विद्यार्थी नवोदय प्रवेशापासून वंचित; खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!
2

JNVST Admission: अनेक विद्यार्थी नवोदय प्रवेशापासून वंचित; खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी!

Granthapal Din: ग्रंथांचे महत्त्व कालातीत; श्रीराम वाचनालयात ग्रंथपाल दिन आणि सत्कार सोहळा थाटात संपन्न!
3

Granthapal Din: ग्रंथांचे महत्त्व कालातीत; श्रीराम वाचनालयात ग्रंथपाल दिन आणि सत्कार सोहळा थाटात संपन्न!

Government School: देशात १० हजारांहून अधिक प्राथमिक शाळा घटल्या; लोकसभेत समोर आलेले धक्कादायक आकडे एकदा बघाच…
4

Government School: देशात १० हजारांहून अधिक प्राथमिक शाळा घटल्या; लोकसभेत समोर आलेले धक्कादायक आकडे एकदा बघाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.