Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

ISRO Recruitment 2026 Notification: भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेच्या (ISRO) 'इस्ट्रॅक' (ISTRAC) मध्ये तांत्रिक आणि वैज्ञानिक पदांची भरती सुरू झाली आहे. १८ ते ३५ वयोगटातील पात्र उमेदवारांना २० जुलै २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 29, 2026 | 12:24 PM
isro

isro

Follow Us
Follow Us:

ISRO Recruitment 2026 : भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटनेत (ISRO) नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या ‘टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क’ ने विविध पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती अंतर्गत तांत्रिक, वैज्ञानिक आणि इतर सपोर्ट स्टाफच्या पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २७ जून २०२६ पासून सुरू झाली असून, उमेदवारांना २० जुलै २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. हे अर्ज केवळ ऑनलाईन माध्यमातूनच स्वीकारले जातील.

‘या’ पदांसाठी होणार भरती

1. टेक्निकल असिस्टंट

2. सायंटिफिक असिस्टंट

3. लायब्ररी असिस्टंट-A

4. टेक्निशियन-B

5. ड्राफ्ट्समन-B

6. कूक-A

निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती संघटनेच्या गरजेनुसार देशभरात असलेल्या इस्रोच्या विविध केंद्रांवर केली जाऊ शकते.

Balbharti Class 6 History Textbook: ६ वी इतिहास पुस्तकातील बदलांवरून वाद: जात व्यवस्था, बौद्ध धर्म आणि आहाराचे संदर्भ का बदलले?

अर्जाची अंतिम तारीख आणि शुल्क

वरील पदांसाठी उमेदवार २० जुलै २०२६ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. तसेच यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज शुल्काची रचना वेगवेगळी आहे. टेक्निकल असिस्टंट आणि सायंटिफिक असिस्टंट पदांसाठी एकूण ७५० रुपये शुल्क तर टेक्निशियन-B, ड्राफ्ट्समन-B आणि कूक-A पदांसाठी एकूण ५०० रुपये शुल्क निश्चित केले आहे. परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार प्रोसेसिंग फी परत केली जाईल, असे इस्रोने स्पष्ट केले आहे.

पात्रता आणि निवड प्रक्रिया काय आहे?

वयोमर्यादा: २० जुलै २०२६ पर्यंत उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता: पदानुसार आयटीआय (ITI), इंजिनिअरिंग डिप्लोमा, बीएससी (B.Sc), लायब्ररी सायन्स मधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, आणि कूक पदासाठी संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव आवश्यक आहे.

निवड पद्धती: उमेदवारांची निवड प्रामुख्याने लेखी परीक्षा किंवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) च्या आधारे केली जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार कौशल्य चाचणी घेतली जाईल. अंतिम टप्प्यात कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.

Paper Leak Cases: गेल्या काही वर्षांत ‘या’ मोठ्या परीक्षांना बसला पेपर लीकचा डाग; लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

१. उमेदवारांनी सर्वप्रथम इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट द्यावी.
२. त्यानंतर ‘Careers’ सेक्शनमध्ये जाऊन ‘ISTRAC Recruitment 2026’ या लिंकवर क्लिक करावे.
३. आता आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करा आणि लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.
४. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, अर्ज शुल्क जमा करा आणि फॉर्म सबमिट करा.
५. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट किंवा पीडीएफ आणि रजिस्ट्रेशन नंबर भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित जतन करून ठेवावा.

Web Title: Isro recruitment 2026 apply online technical scientific assistant jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Government Job
  • ISRO
  • ISRO Scientists
  • Recruitment News

संबंधित बातम्या

NDA Exam: इंग्रजीशिवाय सैन्यात अधिकारी कसे बनू शकता? जाणून घ्या एका क्लिकवर..
1

NDA Exam: इंग्रजीशिवाय सैन्यात अधिकारी कसे बनू शकता? जाणून घ्या एका क्लिकवर..

Government Jobs: १० वी पास आहात आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या कोणकोणत्या विभागांमध्ये मिळतात संधी!
2

Government Jobs: १० वी पास आहात आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या कोणकोणत्या विभागांमध्ये मिळतात संधी!

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?
3

ISRO recruitment 2026: इंजिनिअरिंग तरुणांसाठी मोठी बातमी! ९३ पदांसाठी मेगा भरती जाहीर; कधीपर्यंत करता येईल अर्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.