फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Cats employees in Tokyo: तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचलात आणि डेस्कवर बसण्यापूर्वीच एका गोड मांजराने तुमचे स्वागत केले, तर तुम्हाला कसे वाटेल? साहजिकच, सार्व ताण क्षणात पळून जाईल! जपानची राजधानी टोक्यो येथील ‘क्यूनोट’ (Qnote Inc.) या सॉफ्टवेअर कंपनीने ही अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. या हटके वर्कप्लेसवर माणसांसोबतच ११ मांजरी देखील पूर्णवेळ ‘कर्मचारी’ म्हणून काम करतात. या मांजरी केवळ ऑफिसची शोभा वाढवत नाहीत, तर डेस्कवर फिरणे, न बोलवता मीटिंगमध्ये उपस्थित राहणे आणि कीबोर्डजवळ आळसावून बसणे ही त्यांची रोजची ड्युटी आहे.
हा अनोखा प्रवास २००४ मध्ये सुरू झाला. तेव्हा कंपनीच्या एका संस्थापकाने एका बेवारस मांजरीला दत्तक घेऊन ऑफिसमध्ये आश्रय दिला होता. हळूहळू ही रेलचेल वाढत गेली आणि आज येथे ११ मांजरींचा मुक्काम आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या सर्व मांजरींना कंपनीत अधिकृत पदे देण्यात आली आहेत. या मूक सोबत्यांमुळे ऑफिसचे वातावरण शांत आणि आनंदी राहतेच, शिवाय कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा पूर्णपणे नाहीसा होतो, असा कंपनीचा विश्वास आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की मांजरी कशा प्रकारे वर्कप्लेसवरील ताण कमी करत आहेत.
या अनोख्या कथेची सुरुवात २००४ मध्ये झाली होती. कंपनीच्या संस्थापकाने एका सुशी रेस्टॉरंटजवळ फिरणारी निराधार मांजर (फुताबा) वाचवली आणि ऑफिसमध्ये घेऊन आले. सुरुवातीला ती एकटीच होती. पण हळूहळू इतर रेस्क्यू केलेल्या मांजरीही या कुटुंबाचा भाग बनत गेल्या. आज टोक्यो येथील कंपनीच्या मुख्यालयात एकूण ११ मांजरी कायमस्वरूपी राहतात. त्या कोणत्याही पाळीव प्राण्याप्रमाणे पिंजऱ्यात किंवा घरात बंदिस्त राहत नाहीत, तर संपूर्ण ऑफिसमध्ये बिनधास्त फिरतात. मीटिंग रूम असो किंवा कर्मचाऱ्यांचे वर्क डेस्क, त्या प्रत्येक ठिकाणी वावरतात.
एका GPU च्या शोधाने रचला इतिहास! जगातील सर्वात मोठया टेक कंपनीचे CEO Jensen Huang नेमकं किती शिकलेत?
क्यूनोट कंपनीची संस्कृती अतिशय मजेशीर आणि वेगळी आहे. यामुळेच या सर्व ११ मांजरींना कंपनीत वेगवेगळी पदे देण्यात आली आहेत. कोणतीही मांजर ‘ऑफिस क्लर्क’ पदावर आहे, तर कोणी ‘मॅनेजर’, ‘डिफेन्स डायरेक्टर’ किंवा ‘ऑडिटर’ची जबाबदारी सांभाळत आहे. ही पदे जरी प्रतिकात्मक असली, तरी कंपनी त्यांना आपल्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग मानते. परिस्थिती अशी आहे की, कंपनीत नवीन नोकरीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या रेझ्युमेमध्ये ते ‘कैट लवर’ (मांजरप्रेमी) आहेत की नाही, हेदेखील पाहिले जाते. जे लोक प्राण्यांवर प्रेम करतात, ते कंपनीच्या फ्रेंडली वातावरणात सहजपणे जुळवून घेतात.
ज्याप्रमाणे मांजरींची संख्या वाढली, कंपनीने आपल्या वर्कप्लेसमध्येही मोठा बदल केला. ऑफिसच्या आत मांजरींच्या मौजमजेसाठी १२ कॅट टॉयलेट्स, भिंतींवर चढण्यासाठी विशेष शेल्व्ह्ज, ऊंचे वॉकवे आणि स्क्रॅच रेजिस्टेंट (ज्यांवर ओरखडे पडत नाहीत अशा) भिंती तयार करून घेतल्या आहेत. यामुळे मांजरी कोणत्याही अडथळ्याविना आणि ऑफिसच्या साहित्याचे नुकसान न करता आरामात फिरू शकतात. हे ठिकाण आता एक मॉडर्न सॉफ्टवेअर ऑफिस असण्यासोबतच या मुक्या प्राण्यांचे सुरक्षित घरही बनले आहे.
या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, या गोंडस प्राण्यांसोबत राहिल्यामुळे मानसिक ताण क्षणात नाहीसा होतो. कामाच्या दरम्यान थकवा जाणवल्यास ते थोडावेळ मांजरीला कुरवाळतात किंवा तिच्यासोबत खेळतात. यामुळे मेंदू फ्रेश होतो. कंपनीचे अध्यक्ष नोबुयुकी सुरुता यांच्या मते, कामाच्या वेळी मांजरी डेस्कवर येऊन बसतात किंवा लक्ष वेधून घेतात, तेव्हा त्याला अडथळा न मानता वरदान मानले जाते. यामुळे कर्मचारी स्क्रीनवरून नजर हटवून थोडा ब्रेक घेतात. या मांजरी अनोळखी सहकाऱ्यांमध्ये ‘आइसब्रेकर’चे काम करतात. यामुळे परस्पर संवाद आणि बॉन्डिंग मजबूत होते.






