
JNU MBA Admission 2026
JNU हे देशातील प्रतिष्ठित केंद्रीय विद्यापीठांपैंकी एक मानले जाते. येथील प्रोग्राम आधुनिक व्यवस्थापन, शिक्षण आणि उद्योजकता (Entrepreneurship) लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फक्त थिअरी शिकवली जात नाही तर त्यांना व्यवसायिक समस्या समजून घेण्याचे आणि त्यावर उपाय शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
तसेच शिक्षणादरम्यान यथे विद्यार्थ्यांना लाइव्ह प्रोजेक्ट आणि इंडस्ट्री व्हिजिट,बिझनेस केस स्टडीजच्या कार्यशाळा, सिम्युलेशन एक्सरसाइज, उद्योग तज्ञांची व्याख्याने यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
JNU MBA २०२६-२८ बॅचसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेद्वार १५ मे २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. CAT उत्तीर्ण उमेद्वारांना आणखी एक संधी मिळावी यासाठी विद्यापीठाने अर्जाची प्रक्रिया पुन्हा खुली केली आहे.
उमेद्वाराकडे मान्यतापात्र विद्यपीठाची किमान 3 वर्षाची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे CAT २०२५ चा वैध स्कोर असणे अनिवार्य आहे. उमेद्वाराची निवड ही केवळ CAT स्कोरवर आधारित नसून विद्यपीठ विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि संवादकौशल्याची प्रत्यक्ष चाचणी करेल. त्यानंतरच त्यांची निवड करेल. तरी उमेद्वाराने विहित तारखेपूर्वी JNU विद्यापीठाच्या www.jnu.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.