फोटो सौजन्य -सोशल मीडिया
हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या व्हिजनशी सुसंगत आहे. जे सर्वसमावेशक सहभाग आणि समुदाय चलित शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. या सुधारित मार्गदर्शक तत्वांद्वारे शिक्षण मंत्रालयाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसाठी अधिक आश्वासक आणि प्रतिसाद देणारे चित्र निर्माण करणे हे आहे. याचबरोबर उत्तम शैक्षणिक वातावरण तयार करणे आणि शाळा समुदाय यांच्यात अधिक मजबूत समन्वय निर्माण करणे हे आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समित्या शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि स्थानिक समुदायातील सदस्यांना सामूहिक सहभाग आणि जबाबदारीच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तरी या प्रक्रियेत सातत्य राखणे आवश्यक आहे.






