
Image
अर्ज करण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर २०२६ आहे. AISSEE २०२७ द्वारे देशभरातील प्रमुख ३३ सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी आणि ९ वीचे प्रवेश दिले जातील. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा ३१ जानेवारी २०२७ रोजी आयोजित केली जाईल आणि निकाल परीक्षेच्या ४ ते ६ आठवड्यांनंतर जाहीर केला जाईल. परीक्षेची अचूक तारीख नंतर जारी केली जाईल.
देशभरातील ३३ सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वी मध्ये प्रवेश दिला जाईल. तसेच संरक्षण मंत्रालयाने मंजूर केलेल्या ८० नवीन सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ वीच्या स्तरावर आणि ४० नवीन सैनिक शाळांमध्ये इयत्ता ९ वीच्या स्तरावर प्रवेश मिळेल.
इयत्ता ६ वी साठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२७ रोजी १० ते १२ वर्षांच्या दरम्यान असावे. यासाठी मुलगे आणि मुली दोघेही अर्ज करू शकतात.
नवीन सैनिक शाळांचा ६०% रूट (Category B): यासाठी विद्यार्थी आधीपासूनच संबंधित मंजूर नवीन सैनिक शाळेत नामांकित असणे आणि इयत्ता ५ वी मध्ये शिकत असणे/उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
इयत्ता ९ वी साठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२७ रोजी १३ ते १५ वर्षांच्या दरम्यान असावे. प्रवेशाच्या वेळी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मुलगे आणि मुली दोघेही पात्र आहेत.
जनरल, ओबीसी, संरक्षण, माजी सैनिक प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी ७०० रुपये शुल्क भरावे लागेल.
इयत्ता ६ वी:
कॅटेगरी A (४०% रूट): मुलींसाठी प्रवेश खुला आहे. वयाचे निकष मुलांप्रमाणेच आहेत. उमेदवारांनी संबंधित नवीन सैनिक शाळेच्या संकेतस्थळावर मुलींच्या जागांची उपलब्धता तपासावी.
कॅटेगरी B (६०% रूट): मुलींसाठी प्रवेश खुला आहे. उमेदवारांनी ३१ मार्च २०२७ पर्यंत संबंधित नवीन सैनिक शाळेत इयत्ता ५ वी उत्तीर्ण केलेली असावी किंवा ५ वी मध्ये शिकत असावे.
इयत्ता ९ वी (न्यू सैनिक स्कूल):
कॅटेगरी A (४०% रूट): प्रवेश केवळ अशा मुला-मुलींसाठी आहे ज्यांनी सैनिक स्कूल व्हर्टिकलमध्ये इयत्ता ८ वी उत्तीर्ण केली आहे.
कॅटेगरी B (६०% रूट): प्रवेश केवळ अशा बचीत रिक्त जागांपर्यंत मर्यादित आहे ज्या ४०% रूटअंतर्गत भरल्या गेल्या नाहीत.
Ans: NTA द्वारे जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ डिसेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) आहे.
Ans: इयत्ता ६ वीसाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२७ रोजी १० ते १२ वर्षे दरम्यान असावे. तर इयत्ता ९ वीसाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२७ रोजी १३ ते १५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
Ans: जनरल, ओबीसी, संरक्षण आणि माजी सैनिक प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे, तर एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गासाठी शुल्क ७०० रुपये आहे.