Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army Jobs : भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न करा पूर्ण! 3806 पदांसाठी मोठी भरती; मिळणार ‘इतका’ पगार

टेरिटोरियल आर्मी वर्ष २०२६ साठीची भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३,८०६ सैनिकांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया 'रॅली'च्या स्वरूपात केली जाणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२६ कालावधीत होणार

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 30, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • टेरिटोरियल आर्मी ने वर्ष २०२६ साठीची भरतीची अधिसूचना जारी
  • भरती रॅली कुठे आयोजित केली जाईल?
  • कोणत्या पदांसाठी भरती केली जात आहे?
Territorial Army recruitment 2026, Indian Army Jobs : भारतीय सैन्यात भरती व्हावं आणि देशसेवा करावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पाहणं जितकं सोपं आहे तितकंच ते पूर्ण करणं कठीण आहे. कठीण परिक्षण आणि पुरेपूर मेहनत याची सांगड घालूनच हे मोठं देशसेवेचं ध्येय साध्य केलं जावू शकतं. आताही ही संधी इंडियन आर्मीने दिलेली आहे. टेरिटोरियल आर्मी ने वर्ष २०२६ साठीची भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण ३,८०६ सैनिकांची भरती केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया ‘रॅली’च्या स्वरूपात केली जाणार आहे. जी ऑगस्ट ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्यंत चालणार आहे.

10th Pass Govt Jobs : दहावीनंतर सरकारी नोकरीचे तुमचं स्वप्न होणार साकार; ‘या’ विभागांमध्ये मेगा भरती

भरती रॅली कुठे आयोजित केली जाईल?

या रॅलीज विविध पायदळ बटालियन केंद्रांवर (Infantry Battalion centers) आयोजित केल्या जाणार आहेत. यामध्ये अमृतसर, लुधियाना, बारी ब्राह्मणा, जालंधर, सुरनकोट, बारामुल्ला, राजौरी, बरेली, मेरठ, अल्मोडा, अंबाला, पालमपूर, शिमला, कोटा, जयपूर, श्री गंगानगर आणि दिल्ली यांसारख्या प्रमुख केंद्रांचा समावेश आहे. अभ्यर्थियों को अपनी जोन-वाइज रैली में हिस्सा लेना होगा उमेदवारांनी आपापल्या Zone नुसार या निश्चित केलेल्या रॅलीमध्येच सहभागी होणे आवश्यक आहे. अर्ज देखील ऑफलाइन पद्धतीने भरणे अनिवार्य आहे; त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी आधिकारिक नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला गेला आहे.

कोणत्या पदांसाठी भरती केली जात आहे?

या भरती मोहिमेमध्ये प्रामुख्याने ‘सोल्जर जनरल ड्युटी’ (Soldier GD), ‘सोल्जर क्लर्क’, Soldier Clerk), ट्रेड्समॅन (Tradesmen) आणि इतर संबंधित पदांचा यात समावेश आहे. या संदर्भात एक संक्षिप्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या रॅलीज ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहण्याचे नियोजित करण्यात आलं आहे; काही क्षेत्रांमध्ये (Zones) या रॅलीजचा कालावधी सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

केव्हा कोणत्या झोनमध्ये होणार रॅली?

पटियाला, लुधियाना इत्यादी जिल्ह्यांसाठी: ६ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२६
जम्मू विभागातील जिल्ह्यांसाठी: १३ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६
चंदीगड आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी: १७ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६
दिल्ली आणि आसपासच्या परिसरासाठी: १७ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६
जयपूर विभागातील जिल्ह्यांसाठी: २४ ऑगस्ट २०२६ ते ५ सप्टेंबर २०२६
उत्तराखंडमधील जिल्ह्यांसाठी: ७ सप्टेंबर २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६
श्री गंगानगर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी: १४ सप्टेंबर २०२६ ते १९ सप्टेंबर २०२६
कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या आणि मुलाखती यांच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच, परीक्षेचे निकालही नंतरच्या टप्प्यावर घोषित केले जाईल.

कोणत्या पदासाठी कोणता पात्रता निकष?

सोल्जर जनरल ड्यूटी: या पदासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एकूण गुणांची किमान सरासरी ४५% असणे आवश्यक आहे, तसेच प्रत्येक विषयात किमान ३३% गुण असणे अनिवार्य आहे.सोल्जर क्लर्क: १२ वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. एकूण गुणांची किमान सरासरी ६०% असणे आवश्यक आहे, तसेच प्रत्येक विषयात यात इंग्रजी आणि गणित/लेखाशास्त्र यांसह किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे.ट्रेड्समन (Tradesman): १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ‘हाऊसकीपर’ (Housekeeper) आणि ‘मेस कीपर’ (Mess Keeper) या पदांसाठी ८ वी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे. उमेदवारांनी प्रत्येक विषयात किमान ३३% गुण मिळवलेले असायला हवेत.

वयोमर्यादा काय?

टेरिटोरियल आर्मी म्हणजेच प्रादेशिक सेनेसाठी वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षे आहे. उंचीची किमान अट १६० सें.मी., वजनाची किमान अट ५० कि.ग्रॅ. आणि छातीचे मोजमाप ७७ सें.मी. असणे आवश्यक आहे.

शारीरिक चाचणी (१०० गुण)

शारीरिक चाचणीमध्ये १ मैल धावणे आणि ‘पुल-अप्स’ (pull-ups) यांचा समावेश असतो. १८ ते ३० वर्षे वयोगटातील उमेदवारांनी पूर्ण गुण मिळवण्यासाठी १ मैलाचे अंतर ५ मिनिटे ३० सेकंदांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. ३१ ते ४२ वर्षे वयोगटातील उमेदवारांना याकरिता थोडा अधिक वेळ दिला जाऊ शकतो.

निवड प्रक्रिया कशी असेल?

प्रादेशिक सेनेसाठी (Territorial Army) निवड प्रक्रिया अशा पद्धतीने राबवली जाते.
1. कागदपत्रांची पडताळणी
2. शारीरिक चाचणी
3. लेखी परीक्षा
4. वैद्यकीय चाचणी
5. गुणवत्ता यादी (Merit List)
मागील सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवार पुढील टप्प्यात प्रवेश करु शकतो.

वेतन किती असेल?

निवड झाल्यानंतर, उमेदवारांना ₹15,500 ते ₹69,400 या श्रेणीतील मासिक वेतन मिळते. यामध्ये DA (महागाई भत्ता), HRA (घरभाडे भत्ता), PA (वैयक्तिक भत्ता), MA (वैद्यकीय भत्ता) आणि जोखीम भत्ता (Risk Allowance) यांसारख्या विविध भत्त्यांचा यात समावेश होतो.

अर्ज शुल्क किती आहे?

आवश्यक कागदपत्रांमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच Domicile Certificate, शैक्षणिक गुणपत्रिका, ओळखपत्र  म्हणजे PAN Card आणि Aadhaar Card, चारित्र्य प्रमाणपत्र, लागू असल्यास जात प्रमाणपत्र आणि छायाचित्रे या कागदपत्रांचा समावेश होतो. अर्ज शुल्काच्या संदर्भात, General, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ₹100 शुल्क भरावं लागणार आहे. तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने किंवा ई-चलनद्वारे जमा करता येईल. जर तुम्हाला प्रादेशिक सेनेत (Territorial Army) सामील होण्याची इच्छा असेल, तर लगेच दिलेल्या माहितीची अधिसूचना तपासा आणि तुमच्या क्षेत्रानुसार म्हणजे झोननुसार रॅलीच्या तारखांनुसार लगेच तयारीला लागा.

विद्यार्थ्यांना आता नो टेंशन…! शैक्षणिक दस्तऐवज सांभाळणे होणार सोपे, 10 वी, 12 वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर

Web Title: Jobs indian army jobs who is eligible for territorial army recruitment 2026 age limit salary check here full details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • Army Jobs
  • Career News
  • Job
  • job news
  • Jobs Recruitment
  • Marathi News

संबंधित बातम्या

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज
1

राज्यात एमसीएच्या दुसऱ्या यादीत ७ हजार ४०७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी; ६,३२७ जणांना पसंतीचे कॉलेज

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
2

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
3

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
4

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.