Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia-Ukraine War : युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेची मोठी हालचाल; पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी विटकॉफ-कुशनर करणार स्वतंत्र चर्चा

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर गुरुवारी पुतिन आणि झेलेन्स्की यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत. अबुधाबीतील चर्चेतून निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेऊन शांततेचा मार्ग शोधण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 11, 2026 | 08:44 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • पुतिन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा
  • झेलेन्स्की यांच्याशीही स्वतंत्र बैठक
  • शांतता चर्चेतून युद्ध संपण्याची आशा; मात्र आव्हाने कायम
Russia-Ukraine War :अमेरिकेत मध्यावधी निवडणुका झाला . त्यामध्ये ट्रम्प यांच्या युद्धनीती तसेच युद्ध न करता पुन्हा अमेरिकेला महान बनवायच्या स्वप्नाला स्वतः ट्रम्प यांनीच इराण सोबत युद्ध सुरु करून नुकसान करून घेतले . त्याचा जोरदार फटका ट्रम्प यांना बसला . याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी सुद्धा मान्य केले कि त्यांच्या पराभवाला इराण सोबत केलेलं युद्ध कारणीभूत आहे .

तेव्हा कुठे आता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने पुन्हा एकदा राजनैतिक प्रयत्नांना वेग दिला आहे. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत.

अबुधाबी येथे झालेल्या चर्चेतून निर्माण झालेल्या संधींचा फायदा घेऊन युद्ध संपवण्याच्या दिशेने पुढील पाऊल टाकण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. जवळपास अडीच तीन वर्ष सुरु असलेले युद्ध आता थांबायला हवे असे आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चा सुरु झाल्या आहेत .

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी

पुतिन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण चर्चा

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी संभाव्य शांतता प्रस्ताव आणि दोन्ही देशांमधील मतभेदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अबुधाबी येथे झालेल्या चर्चेत काही सकारात्मक मुद्दे समोर आले असून, त्यावर पुढील चर्चा करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे.

युद्ध संपवण्यासाठी रशियाची भूमिका समजून घेणे आणि शांततेसाठी अनुकूल वातावरण तयार करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये अमेरिकेच्या राजदूतांची राजकीय डिप्लोमसी कशी उपयोगाला येथे हे पाहणे गरजेचे आहे .

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु

झेलेन्स्की यांच्याशीही स्वतंत्र बैठक

पुतिन यांच्यासोबतच्या चर्चेनंतर विटकॉफ आणि कुशनर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत. अबुधाबीमध्ये झालेल्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे आणि रशियासोबतच्या संभाव्य कराराबाबत त्यांना माहिती दिली जाणार आहे. युक्रेनच्या सुरक्षेची हमी, देशाच्या भूभागाचे संरक्षण आणि युद्धानंतरची परिस्थिती हे चर्चेतील महत्त्वाचे विषय ठरू शकतात. युक्रेनच्या हिताला बाधा न आणता युद्ध संपवण्याचा मार्ग शोधणे अमेरिकेसमोर मोठे आव्हान आहे.

शांतता चर्चेतून युद्ध संपण्याची आशा; मात्र आव्हाने कायम

अबुधाबी येथे झालेल्या चर्चेमुळे रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी नव्या शक्यता निर्माण झाल्याचे जॅरेड कुशनर यांनी सांगितले. मात्र, दोन्ही देशांमधील अनेक महत्त्वाचे मतभेद अद्याप कायम आहेत. विशेषतः डोनबास प्रदेशावरील दावा, युक्रेनच्या सुरक्षेची हमी आणि युद्धानंतरच्या राजकीय व्यवस्थेबाबत दोन्ही बाजूंची भूमिका वेगळी आहे.

त्यामुळे अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या या स्वतंत्र भेटी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. या चर्चांमधून युद्धविरामाचा मार्ग निघतो का आणि दोन्ही देश शांतता करारासाठी तयार होतात का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.युद्ध संपून शांतता प्रस्थापित होणं ही आता जगाची गरज झाली आहे . जागतिक आर्थिक मंदी येण्याचे सूतोवाच हळूहळू सुरु झाले आहेत .

Web Title: Russia ukraine war peace talks cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 08:44 PM

Topics:  

  • America news
  • Marathi News
  • Russia and Ukraine war update

संबंधित बातम्या

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी
1

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने
2

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने

Baramati News :दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले
3

Baramati News :दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु
4

Trump News : अमेरिकेत नवा वाद; ट्रम्प कुटुंबाच्या क्रिप्टो व्यवसायाचे पाकिस्तान कनेक्शन; चौकशीची मागणी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.