Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Breaking : इराणच्या धमक्यांमुळे अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट लष्करी तळावर स्थलांतरित

World Breaking : इराणकडून जीवाला धोका असल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी वॉशिंग्टनमधील घर सोडून अज्ञात लष्करी तळावर स्थलांतर केल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणविरोधातील आर्थिक दबाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 11, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • इराणकडून धमक्या मिळाल्याचा दावा
  • इराणवरील आर्थिक दबाव मोहिमेचे पुढारपण यांचेच
  • घराचा फोट प्रसिद्ध झाल्यानंतर सुरक्षेची चिंता वाढली
World Breaking : इराण अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम असा झाला कि, स्पष्टपणे इराण हरले असे पण झाले नाही आणि अमेरिका जिंकली असेही झाले नाही . ना युद्धबंदी झाली , ना त्यावर कोणता तोडगा निघाला , दोन्ही देशांना एकमेकांच्या मागण्या मान्यच होत नाही आहेत . यासगळ्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणि त्याचा तणाव आता अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुरक्षेपर्यंत पोहोचला आहे .

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी इराणकडून जीवाला धोका असल्याच्या धमक्या मिळाल्यानंतर वाशिंग्टन डी.सी. येथील आपले निवासस्थान सोडून एका अज्ञात लष्करी तळावर स्थलांतर केले अशी माहिती मिळत आहे .या बातमीमुळे अमेरिकेचे नाक बऱ्यापैकी कापले गेले आहे . हासत्तेच्या अर्थमंत्र्याला स्वतःच्याच देशात असा सैनिकी आसरा घ्यावा लागतोय ही खूपच खेदाची बाब असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत आहेत .

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी

इराणकडून धमक्या मिळाल्याचा दावा

अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे . असे समजत आहे ,द न्यूयॉर्क टाइम्सने या प्रकरणाची माहिती असलेल्या तीन व्यक्तींच्या हवाल्याने सगळ्यात आधी दिली . त्यानंतर रॉयटर्सनेही दोन सूत्रांच्या आधारे बसेन्ट यांच्या स्थलांतराला दुजोरा दिला . मात्र त्यांच्यावरील धमक्यांची नेमकी तीव्रता अजूनही स्पष्ट झालेली नाही .

इराणवरील आर्थिक दबाव मोहिमेचे पुढारपण यांचेच

स्कॉट बेसेन्ट हे इराणविरोधातील अमेरिकेच्या आर्थिक निर्बंध आणि दबाव मोहिमेचे प्रमुख नेतृत्व करत आहेत. ‘ऑपरेशन इकॉनॉमिक आउटकास्ट’ या मोहिमेअंतर्गत इराणची आर्थिक ताकद कमकुवत करण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच, इराणने जहाजांवरील हल्ले थांबवावेत आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करावी, यासाठी अमेरिकेकडून दबाव वाढवला जात आहे. या मोहिमेमुळे बेसेन्ट हे इराणच्या निशाण्यावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने

घराचा फोट प्रसिद्ध झाल्यानंतर सुरक्षेची चिंता वाढली

बेसेन्ट यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढण्यामागे त्यांच्या वाशिंग्टनमधील घराचा हवाई फोटो प्रसिद्ध झाल्याचेही सांगितले जात आहे . वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या या छायाचित्रामुळे त्यांच्या जॉर्जटाऊन मधील घराचे अचूक ठिकाण ओळखणे शक्य झाले होते . त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना लष्करी तळावर हलवण्यात आल्याची मी,माहिती समोर आली आहे .

मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ते कोणत्या लष्करी तळावर वास्तव्यास आहेत ,याचा तपशील सार्वजनिक करण्यात आला नाही . अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बेसेन्ट इराणच्या धमक्यांमुळे मागे हटणार नसल्याचे स्पष्ठ केले आहे . आर्थिक दबावाची मोहीम आणि इराणवरील निर्बंध सुरूच राहतील , असेही सांगण्यात आले . याचदरम्यान इराणने यापूर्वी अमेरिकेच्या भूमीवर अधिकारी किंवा नागरिकांवर हल्ल्याचा कट रचल्याचे आरोप फेटाळले आहेत . त्यामुळे या प्रकरणामुळे अमेरिका आणि इराण मधील तणावाला आणखी गंभीर रूप मिळण्याची शक्यता आहे .

 

 

Web Title: World breaking scott bessent iran threats cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • America news
  • Iran News
  • Marathi News
  • threatens

संबंधित बातम्या

Russia-Ukraine War : युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेची मोठी हालचाल; पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी विटकॉफ-कुशनर करणार स्वतंत्र चर्चा
1

Russia-Ukraine War : युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेची मोठी हालचाल; पुतिन आणि झेलेन्स्की यांच्याशी विटकॉफ-कुशनर करणार स्वतंत्र चर्चा

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी
2

India-Pakistan Trade News : व्यापार बंदी असतानाही पाकिस्तानने भारतातून ६१.७ दशलक्ष डॉलरच्या वस्तू केल्या खरेदी

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने
3

China Economy News : चीनचा व्यापार अतिरिक्त १.०४ ट्रिलियन डॉलरवर; निर्यातीत मोठी झेप, मात्र देशांतर्गत अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने

Baramati News :दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले
4

Baramati News :दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.