Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : भव्य विज्ञान प्रदर्शन; आपत्कालीन यंत्रणेवर आधारित विद्यार्थ्यांचे सुचक प्रकल्प

तालुक्याचे 53वे विज्ञान प्रदर्शन नेरळ येथे सुरू आहे,या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रतिकृती पाहण्यासाठी शाळांतील विद्यार्थी गर्दी करून आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 18, 2025 | 06:26 PM
Karjat News : भव्य विज्ञान प्रदर्शन; आपत्कालीन यंत्रणेवर आधारित विद्यार्थ्यांचे सुचक प्रकल्प
Follow Us
Close
Follow Us:
  • भव्य विज्ञान प्रदर्शन
  • आपत्कालीन यंत्रणेवर आधारित विद्यार्थ्यांचे सुचक प्रकल्प
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्याचे 53वे विज्ञान प्रदर्शन नेरळ येथे सुरू आहे,या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या प्रतिकृती पाहण्यासाठी शाळांतील विद्यार्थी गर्दी करून आहेत. दरम्यान प्रामुख्याने सध्या निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थितीवर मात करणाऱ्या प्रतिकृती लक्ष वेधत असून त्या प्रतिकृती यांच्या माध्यमातून अनेक सूचना करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी या विषयावर आधारित 53वे कर्जत तालुका प्रदर्शन नेरळ येथील शार्विल स्कूल मध्ये भरले आहे. कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका विज्ञान आणि गणित मंडळ आणि शार्विल स्कूल ऑफ एक्सलँस यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनात प्राथमिक,माध्यमिक या दोन गटात तब्बल 189 प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. त्या प्रतिकृती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी यांनी गर्दी केली आहे. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यापासून तालुक्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळांचे विद्यार्थी यांनी प्रदर्शनाला भेटी देत आहेत. या प्रदर्शनाचा विषय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिकृती मांडल्या आहेत,त्यात प्रामुख्याने आत्मनिर्भर भारत हा विषय घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प हे सरकारला सूचना करणारे ठरू शकतात.

विमानातील बिघाड आणि अपघात

व्यवसायाच्या दुनियेत कमवाल नाव! ‘हे’ कोर्सेस करा अन् सुरु करा स्टार्टअप, ‘पैसा ही पैसा होगा’

जगभरात आणि देशपातळीवर मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात विमान अपघात झाले आहेत. त्या धर्तीवर अभिनव शाळा कर्जत यांच्याकडून मांडण्यात आलेल्या प्रतिकृती नुसार विमान प्रवासातील आपत्कालीन यंत्रणा या विषयावर आरुषी घावट हिने विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यास  काय करावं याबाबत प्रकल्प सादर केला. कारमधील एअर बॅग प्रमाणे विमानात माहिती मिळेल आणि त्यानुसार पायलट कडून आपत्कालीन स्थितीत प्रवासी पॅराशूट प्रमाणे खाली उतरताना एकत्र सर्व प्रवासी उतरू शकतात, अशी सूचना करणारे आपत्कालीन यंत्रणा प्रतिकृती मधून साकारली आहे. बिघाड झाल्यानंतर प्रवासी पाण्यात, जमिनीवर डोंगरावर खाली येत असताना विमानाचा पॅराशूट सारखा खाली येणारा भाग सर्वांचे प्राण वाचवू शकतो अशी सूचना देण्याचा प्रयत्न झाला आहे.

रेल्वे मार्गावरील अपघाताची माहिती..

नेरळमधील एल ए इ एस शाळेच्या विद्यार्थ्यांकडून ट्रॅकपल्स या नावाची प्रतिकृती प्रदर्शनात असून त्यात रेल्वे मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सेन्सर यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल असे मत प्रदर्शन करणारे मॉडेल ठेवले आहे. कोणत्याही रेल्वे मार्गावरील रुळामध्ये भेगा पडणे, क्रॉक होणे हे पाहण्याचे काम दर आठ दिवसांनी होते,मात्र रेल्वे कर्मचारी कडून पाहणी केल्यावर दुसऱ्या दिवशी रुळाला क्रॉक गेल्यावर काय करावे? याबाबत सतर्कता दर्शविणारे रेल्वे सेन्सर यंत्रणेनुसार त्या रुळावरील आणि मार्गावरील अपघाताची स्थिती आधीच लक्षात येईल असे हे सेन्सर आहे.हा प्रकल्प आर्या अरुण खडेकर हिने मांडला आहे.

Raigad News : मूर्ती लहान पण किर्ती महान; जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींमधून कोणत्या प्रकारच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत?

    Ans: विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींमधून प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थिती, अपघात प्रतिबंध, आत्मनिर्भर भारत आणि सुरक्षिततेशी संबंधित उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत.

  • Que: विमान अपघातांवर आधारित प्रतिकृतीमध्ये काय सूचना देण्यात आली आहे?

    Ans: अभिनव शाळा, कर्जत येथील आरुषी घावट हिने विमानात तांत्रिक बिघाड झाल्यास पॅराशूट प्रणालीद्वारे सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या खाली उतरवता येईल अशी आपत्कालीन यंत्रणा सुचवली आहे.

  • Que: रेल्वे अपघात रोखण्यासाठी कोणती प्रतिकृती मांडण्यात आली आहे?

    Ans: नेरळ येथील एल.ए.आय.ई.एस शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅकपल्स’ नावाची सेन्सर आधारित प्रतिकृती मांडली आहे.

Web Title: Karjat news grand science exhibition students suggestive projects based on emergency systems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • karjat news
  • science news

संबंधित बातम्या

Raigad News : मूर्ती लहान पण किर्ती महान; जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत
1

Raigad News : मूर्ती लहान पण किर्ती महान; जिल्हापरिषदेतील शाळकरी विद्यार्थ्याला 22 भाषा अवगत

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी
2

Karjat News : अनधिकृत बांधकामांना अभय कोणाचं ? आता कागद नको कारवाई हवी,अतिक्रमणावर गावकऱ्यांची नाराजी

Karjat News : पटसंख्येअभावी शाळा होणार बंद; जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था
3

Karjat News : पटसंख्येअभावी शाळा होणार बंद; जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?
4

Karjat News : कर्जतमधील प्रस्तावित टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर; नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.