कर्जत/संतोष पेरणे : जिल्हा परिषदेच्या वडगावमधील शाळेचे शिक्षक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.शाळेच्या आवारात असलेल्या भिंती वारली पेंटिंग करून सजवणे,माझा कोपरा माझी कला असे अनेकविध उपक्रम या शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले आहेत. त्यात अगदी वेगळे कार्य या शाळेतील विद्यार्थ्यामध्ये एक आगळा वेगळा गुण दिसून आला आहे. सहावीतल्या या शाळकरी मुलाला संविधानातील मान्यता प्राप्त सर्व 22 भाषा अवगत आहेत.
एकीकडे मराठी शाळा ओस पडत असून शाळेत ना शिक्षक राहिलेत ना विद्यार्थी. मराठी शाळांना वाली कोण ? भविष्यात शाळा वाचतील का असा प्रश्न निर्माण होत असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच कौतुक होताना दिसत आहे. देशाच्या संविधानात 22 भाषांना मान्यता आहे. इयत्ता सहावीत शिकत असलेला विद्यार्थी हर्ष एकनाथ गडगे याला दोन नाही तीन नाही तर चक्क 22 भाषा अवगत आहेत. भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या 22 प्रमुख भाषा फकल लेखन करून वेगळ्या पद्धतीने शालेय सजावट केली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड हे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात.त्यांच्या संकल्पनेला मूर्तरूप या मुलांनी देऊन शाळेच्या वाटचालीस गावकऱ्यांचे आणि पालकांचे सहकार्य लाभत आहे.
रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक ग्रामीण उत्कृष्ट शाळा वडगाव ही जिल्ह्यातील आघाडीची ग्रामीण भागातील शाळा समजली जाते. या शाळेतील सहावीत शिकत असल्याल्या कु.कस्तुरी जयवंत जाधव वपाणी आकांक्षा वाघे या मुलींनी शाळेच्या समोरील बाहेरच्या भिंतींवर प्रसिद्ध वारली चित्रकला सुंदर रित्या साकारून भिंती बोलक्या केल्या आहेत. त्यांना शिकवणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख आहे असे वर्गशिक्षक सुभाष राठोड यांच्या सानिध्यात हे सर्व विद्यार्थी घडत आहेत. सुभाष राठोड यांच्या माध्यमातून शाळेतील मुलांना माझा कोपरा,माझी कला हा उपक्रम दिला होता. त्यातून कस्तुरी व आकांक्षा दोघींच्या विचारांनी ही वारली आदिवासी कलेची भिंत साकारण्याचे ठरवले.
शाळेच्या कार्यालयासमोर अशीच खराब असलेली भिंत खरडून ,साफ करून लाल मातीने शेण मिश्रित मातीने सारवून ती स्वच्छ सुंदर केली. हळूहळू आपल्या कुंचल्यातून वारली चित्रकला चितारत गेली.मुळातच कस्तुरी व आकांक्षा यांना चित्रकलेची प्रचंड आवड आहे. या दोन्ही चिमुकल्या मुलींनी आकर्षक आशी वारली चित्रकलेतून आदिम, आदिवासींची जीवनशैली साकारली आहे. या चित्रांमध्ये जल,जंगल, जमीन असे नाव दिले.घर,पाळीव प्राणी,पक्षी,झाडे असे विविध आशय दिसून येतात.चित्रांतूनआदिवासी निसर्गपूजक असल्याचेही दिसते.एवढ्या लहान वयात तिंच्यातली कल्पकता वाखाणण्यासारखी आहे.
हल्ली शैक्षणिक स्पर्धा वाढत आहेत. त्यामुळे ग्रमीण भागातील पालक देखील मुलांना चांगल शिक्षण मिळावं यासाठी शहरात इंग्रजीमाध्यांना प्राधान्य़ देतात. त्यामुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र असं सगळं असताना जिल्हा परिषद शाळेतील मुलांचे कलाकौशल्य हेच अधोरेखित करतात की, मराठी माध्यमातील मुलं आणि विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं देखील चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात.
Ans: रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे सहावीत शिकणारा कु. हर्ष एकनाथ गडगे हा विद्यार्थी भाररायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे सहावीत शिकणारा कु. हर्ष एकनाथ गडगे हा विद्यार्थी भारतीय संविधानाने मान्यता दिलेल्या सर्व 22 भाषा अवगत करून घेतल्या आहेत.तीय संविधानाने मान्यता दिलेल्या सर्व 22 भाषा अवगत करून घेतल्या आहेत.
Ans: शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक सुभाष राठोड हे नाविन्यपूर्ण शैक्षणिक व कलात्मक उपक्रम राबवत आहेत.
Ans: सहावीत शिकणाऱ्या कु. कस्तुरी जयवंत जाधव व कु. आकांक्षा वाघे या विद्यार्थिनींनी शाळेच्या बाहेरील भिंतींवर सुंदर वारली चित्रकला साकारली आहे.






