Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI in ZP School: जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल! एआयच्या मदतीने तयार केले ॲनिमेटेड व्हिडिओ

ZP School Khadyachapada: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खाड्याचापाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एआय (AI) द्वारे ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केले आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 08, 2026 | 12:03 PM
ZP school

ZP school

Follow Us
Follow Us:

ZP School Khadyachapada: कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या खाड्याच्या पाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षकांचे  मार्गदर्शन घेऊन ॲनिमेटेड व्हिडीओ बनवले. विद्यार्थ्यांच्या कार्यशाळेत बनवलेल्या ॲनिमेटेड व्हिडिओचे कौतुक आता सर्वत्र होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आता रायगड जिल्हा परिषद शाळा, खाड्याचापाडा शाळेने करून दिली आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक संतोष नाटिकर यांचे मार्गदर्शन घेऊन कार्यशाळेत “आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे ॲनिमेटेड व्हिडिओ निर्मिती” केली आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेत इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे मार्गदर्शन शाळेचे शिक्षक संतोष देवेंद्र नाटीकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना एआय चा वापर करून केवळ काही मिनिटांत आकर्षक शैक्षणिक ॲनिमेटेड व्हिडिओ कसे तयार करता येतात, याचे प्रात्यक्षिकासह शिकवले.

PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते IIT दिल्लीत ‘परम प्रज्ञा’ सुपरकंप्यूटर लॉन्च; काय आहेत याची वैशिष्ट्ये? जाणून घ्या

एआयच्या आधारे ॲनिमेटेड व्हिडिओ केले तयार

या विद्यार्थ्यांनी स्वतः एआयच्या साहाय्याने विविध विषयांवरील ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिकण्याची उत्सुकता विशेष लक्षवेधी ठरली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थीही आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.

NEET Paper Leak: प्रश्नपत्रिका कशी फुटली? सीबीआयच्या ९४ पानांच्या दोषारोपपत्रातून खळबळजनक माहिती समोर!

या कार्यशाळेत तयार झालेले विद्यार्थ्यांचे व्हिडिओ तसेच संपूर्ण कार्यशाळेचा विशेष व्हिडिओ “Learn with Santosh Natikar” या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.या माध्यमातून इतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना देखील एआय आधारित शिक्षणाची प्रेरणा मिळत आहे.

कौशल्यधिष्ठित शिक्षण देणारी शाळा

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी आणि भविष्याभिमुख ठरला आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने रायगड जिल्हा परिषद शाळा, खाड्याचापाडा आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याची भावना पालक वर्गातून व्यक्त होत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा अभिनव प्रयत्न शिक्षण क्षेत्रात निश्चितच आदर्श ठरत आहे. आता विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्ठित शिक्षण देणारी शाळा म्हणून खाड्याचापाडा शाळेचा लौकिक आहे.

Web Title: Karjat zp school students create ai animated videos news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • ai
  • education
  • ZP School

संबंधित बातम्या

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा
1

IIT Student Suicides: IIT मधील विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात? १० वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ; अहवालातून खळबळजनक खुलासा

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच
2

Rayat Shikshan Sanstha: ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
3

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा
4

ASCI चा मोठा निर्णय, AI युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल; Vision 2032 द्वारे आखली नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.