Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; शिक्षणाऐवजी गैरसोयींचाच सामना

कसारा केंद्रांतर्गत ३६ जिल्हा परिषद शाळा व ४ खाजगी शाळा कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या शैक्षणिक केंद्र शाळेतच मूलभूत सुविधा दुरवस्थेत असल्याने पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 06, 2026 | 05:19 PM
जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! (photo Credit- X)

जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था! (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • जि. प. शाळेच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था!
  • अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
  • शिक्षणाऐवजी गैरसोयींचाच सामना
ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या शहापूर तालुक्यातील कसारा शाळा क्रमांक येथील मुलींच्या स्वच्छता गृहाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. अस्वच्छतेमुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे मुलींची सर्वाधिक कुचंबना होत आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रित करून शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांनी शाळेच्या स्वच्छता गृहाची पाहणी करून तत्काळ गटविकास अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी यांना फोनद्वारे संपर्क साधून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कसारा केंद्रांतर्गत ३६ जिल्हा परिषद शाळा व ४ खाजगी शाळा कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या शैक्षणिक केंद्र शाळेतच मूलभूत सुविधा दुरवस्थेत असल्याने पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्याच स्वच्छता गृहाचा वापर करत होते. त्याठिकाणी पाण्याचा तुटवडा होत असल्यामुळे मुलांना उघड्यावर जावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

UPSC CSE 2026 Notification: यूपीएससीच्या ९३३ जागांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

अस्वच्छतेमुळे शाळेच्या वर्गामधील वातावरण होते आहे प्रदुषित

अस्वच्छतेमुळे वर्गामध्ये दुर्गंधी पसरत असून संपूर्ण शालेय वातावरण दूषित होत आहे. याचा थेट परिणाम इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी दरम्यान निदर्शनास आले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना त्वचारोग, श्वसनाचे विकार, संसर्गजन्य तसेच मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्राथमिक केंद्रीय शाळेत शिक्षण परिषद घेतली जाते.

परिसरातील बहुतांश शिक्षक-शिक्षिका उपस्थित असतात. तसेच इतर कार्यक्रमही याठिकाणी साजरे केले जातात. यातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ये-जा असताना अशा अस्वच्छतेमुळे सर्वांनाच गैरसोयीचा सामना करावा लागतो.

विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष

विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे खडेबोल ठाकरे गटाचे तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांनी तालुका प्रशासनाला सुनावले आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत शाखाप्रमुख अनंत शिंदे, उपशाखाप्रमुख प्रशांत पवार, आकाश वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

Web Title: Kasara zp school sanitation issue girls toilet condition thackeray group warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Career News
  • School

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
2

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
3

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
4

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.