Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण रेल्वेमध्ये भरती प्रक्रियेला होणार सुरुवात; अनेक पदांसाठी केली जाणार उमेदवारांची नियुक्ती

गणपती उत्सवासाच्या शुभमुहूर्तावर कोकण रेल्वेने रोजगार निर्मितीच्या शुभ कार्याला सुरुवात करण्याचे योजिले आहे. कोकण रेल्वेमध्ये अनेक पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. १६ सप्टेंबरपासून ये भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 03, 2024 | 02:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय रेल्वेमध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यातर येणार आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून इच्छहुक उमेदवारांना रिक्त जगनला अर्ज करता येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे कोकण रेल्वेने या संधीला स्थान दिले आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची रिक्त जागा शिल्लक आहे. या जागांना भरण्यासाठी कोकण रेल्वेने भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी क्षेत्रात काम करता येणार आहे. कोकण रेल्वेमधील या भरती प्रक्रियेसंबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिसूचनेमध्ये या भरती प्रक्रिये विषयक सखोल माहिती देणार आली आहे. उमेदवारांना या अधिसूचनेचा अभ्यास करता येणार आहे तसेच भरती प्रक्रियेसंबंधित सर्व माहिती अभ्यासून भरतीची तयारी करता येणार आहे.

हे देखील वाचा : भारताचे राष्ट्रीय अभिलेखाकार येथे विविध पदांवर भरती सुरु; ‘ही’ असेल अर्जासाठी शेवटची मुदत

कोकण रेल्वेमध्ये टेक्निशियन तसेच लोको पायलट आणि इतर विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणारा आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यासाठी उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्याची सुरुवात १६ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. तर शेवटची तारीख ६ ऑक्टोबर आहे. एकंदरीत, उमेदवारांना १६ सप्टेंबरपासून ते ६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी konkanrailway.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. वेळेची मुदत संपण्याअगोदर इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवतील अशी आशा कोकण रेल्वेने व्यक्त केली आहे.

कोकण रेल्वेद्वारे आयोजित असलेल्या या भरतीप्रक्रियेमध्ये १९० रिक्त जागांचा विचार केला जाणारा आहे. या रिक्त पदांमध्ये सीनियर सेक्शन इंजीनियरच्या ०५ पदांचा, टेक्निशियनच्या ०५ पदांचा, असिस्टंट लोको पायलटच्या १५ रिक्त जागांचा, वरिष्ठ सेक्शन इंजीनियरच्या ०५ रिक्त जागांचा तसेच कमर्शियल पर्यवेक्षकाचा एकूण ०५ जागांचा समावेश आहे. तसेच ट्रैक मेंटेनर, टेक्निशियन, स्टेशन मास्टर, मालगाडी प्रबंधक, पॉईंट्स मॅन, ESTM पदातील रिक्त जागांचाही विचार केला जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना ८५० रुपयांची लागण अर्जाची फि म्हणून भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना त्याचबरोबर माजी सैनिक आणि महिलांना अर्ज शुल्क निशुल्क आहे. त्यांच्याकडून कोणतीही रक्कम आकारली जाणार नाही.

हे देखील वाचा : नौदलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12 वी पास उमेदवार करु शकतात अर्ज, पगार 69 हजार रुपयांपर्यंत

या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना काही अटी शर्तींमध्ये पात्र होणे अनिवार्य आहे. या अटी शिक्षणासंबंधित आहेत. मुळात वेगवेगळ्या पदांसाठी शिक्षण वेगवेगेळे आहेत. कोकण रेल्वेने जाहीर केलेल्या अधिसूचनेत उमेदवारांच्या शिक्षण अटीसंबंधित सखोल माहिती पुरवली गेली आहे. त्यामुळे या संबंधित सखोल माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचना एकदा नजरेखालून घ्यावी. अधिसूचना कोकण रेल्वेच्या konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे.

Web Title: Konkan railway recruitment process begin recruitment heppening for several posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 02:49 PM

Topics:  

  • government jobs

संबंधित बातम्या

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज
1

Government Jobs: सरकारी नोकरी ईच्छुकांसाठी खुश खबर! तब्बल ७ हजार पदांसाठी भरती जाहीर, असे करू शकतात अर्ज

मोटार ट्रान्सपोर्ट क्षेत्रात घडवा करिअर! वेळ दवडू नका, आजच करा अर्ज
2

मोटार ट्रान्सपोर्ट क्षेत्रात घडवा करिअर! वेळ दवडू नका, आजच करा अर्ज

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज
3

Top 7 Government Jobs Last Date 2025: या आठवड्यात 7 मोठ्या सरकारी नोकरीची भरतीची शेवटची तारीख, त्वरीत करा अर्ज

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान
4

Government Jobs: 1.5 लाखाची सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, हातातून निसटल्यास आयुष्यभराचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.