फोटो सौजन्य- iStock
भारतीय सैन्यदलात नोकरी म्हणजे आपल्याला देशसेवा करण्याची थेट संधी असते. त्यामुळे सैन्यदलात सामील होण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. लाखो उमेदवार यासाठी परीक्षा देतात मात्र केवळ काही जणांना भारताच्या सैन्यदलात देशसेवा करण्याची संधी मिळते. मात्र अनेक जण एका परीक्षेत उतीर्ण न झाल्यास अधिक मेहनत करुन उर्तीर्ण होण्याची कामगिरी करतातच. ज्यांना देशसेवा करायची आहे त्यांसाठी नौदलाने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. जाणून घेऊया याबद्दल
भारतीय नौदलाने SSR वैद्यकीय सहाय्यक पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी शनिवार ७ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहेत. या भरतीप्रक्रियेमध्ये 12वी पास अविवाहित युवक या फॉर्म भरू शकतात. या भरतीप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता नौदलाच्या https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. 17 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची तारीख आहे. भरतीप्रक्रियेच्या जाहिरातीची लिंक खाली दिली गेली आहे.
उमेदवाराची शैक्षणिक पात्रता
नौदलातील या भरतीसाठी उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह 12वी उत्तीर्ण असावा. एकूण ५० टक्के गुण आणि प्रत्येक विषयात ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराचा जन्म 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान झाला असावा.
SSR वैद्यकीय सहाय्यक भरतीसाठी शारीरिक निकष
किमान उंची- 157 सेमी
छाती- किमान 5 सेमी विस्तारली पाहिजे
शारीरिक फिटनेस चाचणी
निवड प्रक्रिया
सर्व प्रथम 12वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर त्यांची लेखी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा आणि वैद्यकीय चाचणी होईल.
SSR वैद्यकीय सहाय्यकाचे वेतन आणि भत्ते
भरतीप्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये भरतीप्रक्रियेची सविस्तर माहिती दिली गेली आहे.
भरतीप्रक्रियेच्या जाहिरातीसाठी इथे क्लिक करा.