Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medical education : वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा

वैद्यकीय शिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान व संकल्पनांचा समावेश अद्याप अपुरा असल्याने सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत आहे. एका अभ्यासात वैद्यकीय शिक्षणात या अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अद्याप अपुरा आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 01, 2026 | 11:30 AM
वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा (फोटो सौजन्य-Gemini)

वैद्यकीय शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव? अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • डॉक्टर त्रयीच्या अभ्यास निरीक्षणातून उपस्थित प्रश्न
  • आरोग्य क्षेत्रात एआय, जीनोमिक्स आणि प्रिसिजन मेडिसिन वाढता वापर
  • अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अजूनही अपुरा
राम खांदारे , मुंबई : सध्या वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, जीनोमिक्स आणि प्रिसिजन मेडिसिनचा वेगाने वाढता वापर पाहता, भविष्यातील डॉक्टर या बदलांसाठी कितपत तयार आहेत, असा सवाल डॉक्टर त्रयीच्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आला आहे. अर्चिव्ह्ज ऑफ मेडिसिन अँड हेल्थ सायन्समध्ये प्रकाशित एका अभ्यासात वैद्यकीय शिक्षणात या अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अद्याप अपुरा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अभ्यास केईएम रुग्णालय माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, डॉ. पिथीयल रवी शंकर, आणि डॉ. रानो मल पिर्यानी या डॉक्टर त्रयीने केला आहे.

Jobs Alert! सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी Special Recruitment

आरोग्यसेवेचा चेहरा झपाट्याने बदलत असताना, डॉक्टरांना आता केवळ रोगनिदान आणि उपचारांपुरते मर्यादित राहता येणार नाही. तर जीन-आधारित उपचारपद्धती, प्रेसिजीन मेडिसिन म्हणजेच वैयक्तिकृत औषधोपचार आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा आरोग्य डेटा यामुळे डॉक्टरांना नव्या कौशल्यांची गरज भासत आहे. रुग्णही अधिक माहितीपूर्ण होत असून उपचार प्रक्रियेत सक्रिय सहभागाची अपेक्षा वाढत आहे. दरम्यान, डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे आरोग्यसेवा अधिक डेटा-आधारित आणि रुग्णकेंद्रित होत आहे. मात्र, यासाठी डॉक्टरांना तांत्रिक कौशल्यांसोबत नैतिक आणि गोपनीयतेसंबंधी बाबींचीही जाणीव असणे आवश्यक आहे. योग्य वेळी अभ्यासक्रमात बदल न झाल्यास, भविष्यातील आरोग्य व्यवस्थेला आवश्यक त्या कौशल्यांचा अभाव भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अभ्यास निष्कर्ष

अभ्यासानुसार, वैद्यकीय विद्यार्थ्यांना जीनोमिक डेटा समजून घेणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर आधारित उपचार निर्णय घेणे या बाबतीत प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. तसेच, रुग्णांना जनुकीय चाचण्यांचे परिणाम समजावून सांगण्याचे कौशल्य विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र सध्याच्या अभ्यासक्रमात या बाबींना मर्यादित स्थान मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

“प्रिसिजन मेडिसिन आणि जीनोमिक्स हे भविष्यातील आरोग्य व्यवस्थेचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणात त्यांचा सखोल समावेश करणे अपरिहार्य आहे. त्याच वेळी कोरोना सारख्या नव्या पँडेमिक यांची नव्या पिढीतील डॉक्टरांना जाणीव असणे महत्वाचे झाले आहे.’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ वैद्यकीय अभ्यासक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

माण तालुक्यात जि.प. शाळांचा बोलबाला; खासगी शाळांनाही टक्कर

Web Title: Lack of advanced concepts in medical education india concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • india
  • Medical Education
  • Mumbai

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत
3

पैसे भरले, अर्ज केला; तरीही घर नावावर नाही! गोरेगावच्या मोरारजी मिल म्हाडा संकुलातील रहिवासी वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.