Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांना स्मार्ट ‘पोलिसिंग’चे धडे! सायबर धोक्यांविरुद्ध सजगतेची माहिती, सीसीसीचे दिले प्रात्यक्षिक

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्तालयात शैक्षणिक भेट देत आधुनिक पोलिसिंगचा अनुभव घेतला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 08, 2026 | 03:48 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : डिजिटल युगात झपाट्याने वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे भान देण्यासाठी पोलिस आयुक्तालयात विशेष शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या एमसीए व बीसीए विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होत आधुनिक पोलिसिंगचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तंत्रज्ञान आणि कायदा अंमलबजावणी यांचा संगम पाहताना विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली.

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढतोय की कमी होतोय? छत्रपती संभाजीनगरातली प्रवेशसंख्या आश्चर्यकारक

सायबर सेलमध्ये सहायक निरीक्षक कदिर देशमुख व हवालदार सोनाली वडनेरे यांनी सोशल मीडिया फसवणूक, आर्थिक घोटाळे आणि ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या नव्या गुन्ह्यांच्या पद्धतींबाबत सविस्तर माहिती दिली. गुन्हेगार कशा प्रकारे लोकांना जाळ्यात ओढतात आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर विश्वातील संभाव्य धोके अधिक स्पष्टपणे समजले. याशिवाय उपनिरीक्षक गणेश गिरी यांनी डिजिटल फॉरेन्सिक्सच्या मदतीने गुन्ह्यांचा तपास कसा केला जातो, याचे प्रभावी सादरीकरण केले.

या भेटीदरम्यान सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील करिअर संधींबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. वाढत्या डिजिटल युगात सायबर तज्ञांची गरज वाढत असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात कौशल्य विकसित करून देशसेवेत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.

सीआरओ कार्यालयात ‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवा प्रणालीचे लाइव्ह प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. एका फोन कॉलनंतर काही क्षणांत पोलिस यंत्रणा कशी सक्रिय होते, हे पाहून विद्यार्थ्यांना पोलिसांच्या तत्परतेचा अनुभव आला. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मिळणाऱ्या मदतीबद्दल विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.

Degreeचे निकष बदलले! ‘या’ महाविद्यालांमध्ये तीन नाही तर चार वर्षांचा अभ्यासक्रम, मार्गदर्शक सूचना जाहीर

तसेच कमांड अँड कंट्रोल सेंटर (सीसीसी)मध्ये शहरभर उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही नेटवर्क, वाहतूक नियंत्रण प्रणाली आणि गुन्हे प्रतिबंधासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरची माहिती देण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरक्षेची नवी व्याख्या विद्यार्थ्यांसमोर उभी करण्यात आली. या संपूर्ण शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक होण्याची जाणीव अधिक बळकट झाली.

Web Title: Lessons in smart policing for students information on awareness against cyber threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Career
  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Water Crisis : सातारा-देवळाईकरांचा ठिय्या; ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण, वापरात केवळ ४ शहरात तरी टंचाई कायम
1

Water Crisis : सातारा-देवळाईकरांचा ठिय्या; ५० पैकी १८ जलकुंभ पूर्ण, वापरात केवळ ४ शहरात तरी टंचाई कायम

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट
2

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
3

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
4

MBA vs PGDM Difference: एमबीए आणि पीजीडीएममध्ये नेमका काय फरक आहे? विद्यार्थ्यांसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.