पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षाची तरतूद करून विद्यार्थ्यांना ऑनर्स किंवा संशोधनासह ऑनर्स पदवी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली (फोटो - Istock)
सोनाजी गाढवे : पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शैक्षणिक वर्ष २०२६–२७ पासून चार वर्षांच्या ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार सध्या तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या संलग्न महाविद्यालयांना चौथे वर्ष सुरू करण्यासाठी स्वतंत्र परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. (Education news)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमात चौथ्या वर्षाची तरतूद करून विद्यार्थ्यांना ऑनर्स किंवा संशोधनासह ऑनर्स पदवी मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या चौथ्या वर्षाच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्याने महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे चौथ्या वर्षाच्या ऑनर्स आणि संशोधनासह ऑनर्स अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
या सूचनांनुसार पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांना चौथ्या वर्षाचा ऑनर्स अभ्यासक्रम थेट सुरू करता येणार आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासह पीएचडी संशोधन केंद्र असलेल्या महाविद्यालयांना संशोधनासह ऑनर्स (ऑनर्स विथ रीसर्च) अभ्यासक्रम थेट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र केवळ तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांना चौथे वर्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ आणि शासनाची स्वतंत्र मान्यता घ्यावी लागणार आहे.
हे देखील वाचा : हिंजवडी–नवलाख उंब्रे मार्गावर मेट्रो धावणार? माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बिगरव्यावसायिक (नॉन एआयसीटीई) अभ्यासक्रमांमध्ये चौथ्या वर्षासाठी चार वर्षांची ऑनर्स पदवी आणि संशोधनासह ऑनर्स असे दोन पर्याय उपलब्ध असतील. या अभ्यासक्रमांमध्ये मुख्य विषयासोबत बहुविद्याशाखीय दुय्यम विषय, मुक्त निवड विषय, व्यावसायिक व कौशल्यवर्धन अभ्यासक्रम, क्षमता वर्धन अभ्यासक्रम, मूल्यशिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, सहशैक्षणिक अभ्यासक्रम, ऑन जॉब प्रशिक्षण, क्षेत्रीय प्रकल्प आणि लोकसहभाग प्रकल्प यांचा समावेश असणार आहे.
चार वर्षांच्या ऑनर्स पदवीसाठी विद्यार्थ्यांना एकूण १६० ते १७६ श्रेयांक पूर्ण करावे लागतील. तसेच चार श्रेयांकांचे कार्यप्रशिक्षण (इंटर्नशिप) पूर्ण करणे आवश्यक राहील. संशोधनासह ऑनर्स पदवीसाठी चौथ्या वर्षात मुख्य विषयात १२ श्रेयांकांचा संशोधन प्रकल्प किंवा प्रबंध सादर करणे बंधनकारक राहणार आहे. या १२ श्रेयांकांचे सातवे आणि आठवे सत्र यामधील विभाजन करण्याचा निर्णय संबंधित विद्यापीठ किंवा स्वायत्त महाविद्यालय घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यापीठांच्या विभागांना चौथे वर्ष थेट सुरू करता येणार आहे. तसेच संलग्न किंवा स्वायत्त महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना लॅटरल एंट्रीद्वारे चौथ्या वर्षात प्रवेश देता येईल. विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या शैक्षणिक कामगिरीची पडताळणी करून श्रेयांक हस्तांतरणाच्या आधारे तसेच राज्य शासनाच्या आरक्षण धोरणानुसार प्रवेश दिला जाईल.
हे देखील वाचा : सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढतोय की कमी होतोय? छत्रपती संभाजीनगरातली प्रवेशसंख्या आश्चर्यकारक
स्वयम’ संकेतस्थळाद्वारे शिकवण्याची मुभा
चौथ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सत्रनिहाय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आणि सत्र परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल. या मूल्यमापनाचे प्रमाण संबंधित विद्यापीठ निश्चित करणार आहे. तसेच एका सत्रातील एकूण अभ्यासक्रमापैकी ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाइन माध्यमातून ‘स्वयम’ संकेतस्थळाद्वारे शिकवण्याची मुभा देण्यात आली आहे.
पीएचडी केंद्र नसलेल्यासाठी काय निकष?
पदव्युत्तर किंवा पीएचडी केंद्र नसलेल्या महाविद्यालयांमध्ये चौथे वर्ष सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मान्यताप्राप्त प्राध्यापक, नॅक मानांकन, संशोधन प्रयोगशाळा, ग्रंथालय, सॉफ्टवेअर, तसेच उद्योग किंवा संशोधन संस्थांशी सहकार्य यांसारख्या निकषांचा विचार करून विद्यापीठ स्वतंत्र पात्रता निकष निश्चित करणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
या आहेत महत्त्वाच्या अटी






