फोटो सौजन्य- सोशल मीडिया
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी आयुर्वेद बीएएमएस, होमिओपॅथी बीएचएमएस आणि युनानी बीयुएमएस या तीन अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या फेरीनंतर बुलढाणा येथील नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाला प्राधिकरणाकडून प्रथमच परवानगी मिळाली. स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्याची परवानगी नसल्याने उच्च गुणवत्ता प्राप्त उमेदवारांना नवीन शासकीय महाविद्यालयात संधी मिळणार नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने प्रवेशासाठी विशेष चौथी कॅप फेरी आयोजित केली होती.
या चौथ्या यादीत तिन्ही अभ्यासक्रमांच्या राज्यातील २०८ आयुष महाविद्यालयांतील १४,२०५ जागांपैकी तिसऱ्या फेरीपर्यंत ११,५९१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या विशेष यादीत १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. आता ६३५ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील. स्ट्रे राऊंडचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बीएएमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यातील १४१ महाविद्यालयांतील ९,५७९ जागांपैकी ८,१५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत १,२७७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये १५१ जागा रिक्त आहेत. यापैकी २४ शासकीय महाविद्यालयांत २२२ आणि ११७ खासगी महाविद्यालयांत १,०५५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
बीएचएमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यातील ५९ महाविद्यालयांतील ४,१९६ जागांपैकी ३,०४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत ६७० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये ४८४ जागा रिक्त आहेत. यापैकी २ शासकीय महाविद्यालयांत ३० आणि ५७ खासगी महाविद्यालयांत ६४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
बीयुएमएस अभ्यासक्रमाच्या चौथ्या यादीत राज्यातील ८ महाविद्यालयांतील ४३० जागांपैकी ३९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चौथ्या फेरीत ३२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये एकही जागा रिक्त नाही. यापैकी ३ शासकीय महाविद्यालयांत १ आणि ५ खासगी महाविद्यालयांत ३१ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक ती मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
Ans: या चौथ्या विशेष यादीत राज्यातील एकूण १,९७९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये आयुर्वेद (BAMS) १,२७७, होमिओपॅथी (BHMS) ६७० आणि युनानी (BUMS) ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Ans: चौथ्या विशेष यादीनंतर तिन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून एकूण ६३५ जागा रिक्त आहेत (BAMS १५१ आणि BHMS ४८४ जागा). या सर्व रिक्त जागा पुढील स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील.
Ans: चौथ्या विशेष फेरीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आवश्यक मूळ कागदपत्रे आणि शुल्काच्या डिमांड ड्राफ्टसह वाटप झालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे.






