Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगलीतील सर्व शाळांमध्ये ३० सप्टेंबर पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करा! पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे निर्देश

विद्यार्थी सुरक्षा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यासंबंधी जिल्हास्तरावर अमंलबजावणी केली जात आहे. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये 30 सप्टेंबर 2024 पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करावेत. असे निर्देश सांगलीतील पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले.

  • By नारायण परब
Updated On: Sep 10, 2024 | 09:17 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

बदलापूर ते राज्यातील विविध शाळेतील लैगिक शोषणाच्या प्रकरणानंतर विद्यार्थी सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासंबंधी महत्वाचे निर्देश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी जिल्हास्तरावर वेगाने केली जात आहे. सांगली जिल्हासंबंधीही पालकमंत्र्यांनी यासंबंधीचे निर्देश दिले आहे.

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी निर्देश दिले की,  शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये 30 सप्टेंबर 2024 पूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते कार्यान्वित करावेत.

या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, अविनाश गुरव, रावसाहेब पाटील यांच्यासह समिती सदस्य व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा- राज्यात नाशिक येथे आदिवासी विद्यापीठ स्थापन केले जाणार- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वचक निर्माण करावा

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शाळेतील सर्व कर्मचारी, शिक्षकांचे पात्रता प्रमाणपत्र बंधनकारक असून सर्वांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी विविध माध्यमातून प्राप्त निधी विचारात घेवून उर्वरित आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त करून घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करावा. 100 टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याची दक्षता घ्यावी. शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वचक निर्माण करावा. दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

हे देखील वाचा- ८०० जास्त जागांसाठी भरतीला सुरुवात; अंगणवाडी कार्यकर्ता पदी होणार निवड

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्‍याचे निर्देश दिले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांनी जिल्हा विद्यार्थी सुरक्षा समितीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत आर्थिक हातभार लावून जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, गणेश मंडळे, शिक्षक व कर्मचारी संघटना यांच्याकडूनही यासाठी मदत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Make cctv cameras operational in all schools in sangli before september 30 guardian minister dr directed by suresh khade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 09:17 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
1

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध
2

आरक्षण बचावसाठी आदिवासींचा विराट मोर्चा, धनगर आणि बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाला विरोध

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर
3

२०८ गावांमधील भात पीक नुकसानीचे पंचनामे सुरु, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतीच्या बांधावर

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय
4

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.