Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skill Development : कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये केवळ स्वदेशी कन्सलटंसी कंपन्यांनाच प्राधान्य, मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय

आयटीआयमध्ये शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम,विविध कार्यशाळा आणि रोजगारासंबंधी संशोधनात्मक अहवाल आणि धोरणाची रुपरेषा तयार करण्यासाठी विदेशी कंपन्यांच्या ऐवजी आता भारतीय कन्सलटंसी नेमण्यात येईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2025 | 06:42 PM
कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये केवळ स्वदेशी कन्सलटंसी कंपन्यांनाच प्राधान्य

कौशल्य विभागाच्या संस्थांमध्ये केवळ स्वदेशी कन्सलटंसी कंपन्यांनाच प्राधान्य

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कौशल्य विभागाच्या सर्व संस्थांमध्ये संशोधनात्मक काम आणि सल्लागाराची भूमिका यापुढे केवळ स्वदेशी कंपन्याच करणार आहेत. कौशल्य,उद्योजकता,रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भातला निर्णय घेतला आहे. आयटीआयमध्ये शिकवले जाणारे विविध अभ्यासक्रम,विविध कार्यशाळा आणि रोजगारासंबंधी संशोधनात्मक अहवाल आणि धोरणाची रुपरेषा तयार करण्यासाठी विदेशी कंपन्यांच्या ऐवजी आता भारतीय कन्सलटंसी नेमण्यात येईल. कौशल्य विभागाकडून यासंदर्भातली नियमावली व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला लवकरच पाठवण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी दिली.

RBI मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात! बँकिंग क्षेत्रात घडवा करिअर

देशाचे लाडके आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांपूर्वी स्वदेशी संकल्पनेवर आधारित ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात देशात विविध क्षेत्रातील भारतीय कंपन्यांचा उदय झाला. स्टार्टअपच्या पुढाकारानंतर काही भारतीय कन्सलटंसी कंपन्यांनी ही विविध क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. आता परदेशी कंपन्यांवर अवलंबून न राहता संशोधनात्मक कामासाठी भारतीय कंपन्यांना नेमून या क्षेत्रातही स्वदेशीची संकल्पना साकारण्यात येत असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातल्या विविध व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्याधुनिक बदल करण्यात येत आहेत. मात्र हे बदल करत असताना आपल्या वाटचालीत भारतीय विचारांच्या स्वदेशी कंपन्यांचाही सहभाग असावा यासाठी स्वदेशी कन्सलटंसी नेमण्यात येत असल्याचेही लोढा यांनी सांगितले.

कौशल्य विभागाने घेतलेला निर्णय या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सह संबंधित अजेंसींना आणि कौशल्य विभागाच्या रोजगार सेवायोजन कार्यालयाना हा निर्णय लागू असणार आहे. जागतिक स्पर्धेत भारतीय तरुणांना रोजगाराचे दालन खुले व्हावे आणि दर्जेदार कुशल कारागीर निर्माण व्हावेत यासाठी कौशल्य विकास विभाग कार्यरत आहे. तसेच या संदर्भातील संशोधनात्मक कार्यात आता भारतीय सल्लागार कंपन्याचेही बहुमोल योगदान लाभणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प केला असून भारतीय कंपन्यांना विविध क्षेत्रात संधी देणे हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळण्याबरोबरच भारतीय कंपन्यांचा जगातही नाव लौकिक वाढण्यास मदत होणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नमूद केले आहे.

कॅनरा बँकेत निघाली भरती! ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीत अर्ज स्वीकारले जाणार

Web Title: Mangala prabhat lodha on domestic consultancy companies are given priority in the institutions of the skill department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • Career News

संबंधित बातम्या

10 वी पास उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरी, सिक्युरिटी असिस्टंट ट्रान्सपोर्टसाठी ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
1

10 वी पास उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरी, सिक्युरिटी असिस्टंट ट्रान्सपोर्टसाठी ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

Railway Recruitment: 2000 पेक्षा अधिक जागांवर भरती! परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, कशी ते घ्या जाणून
2

Railway Recruitment: 2000 पेक्षा अधिक जागांवर भरती! परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, कशी ते घ्या जाणून

SBI PO Result 2025: एसबीआय पीओ प्रिलिम्सचा निकाल लवकरच होणार जाहीर, एका क्लिकमध्ये मिळवा तपशील
3

SBI PO Result 2025: एसबीआय पीओ प्रिलिम्सचा निकाल लवकरच होणार जाहीर, एका क्लिकमध्ये मिळवा तपशील

न्यायालयात सुपर भरती! ३० पदांसाठी निवड प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत स्वीकारले जातील अर्ज
4

न्यायालयात सुपर भरती! ३० पदांसाठी निवड प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत स्वीकारले जातील अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.