Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडिलांचे स्वप्न केले साकार! पहिले बनली IPS मग IAS बनून बजावतेय महत्वाची भूमिका

मुद्रा गैरोला हिने अपयशावर मात करत वडिलांचे UPSC चे स्वप्न साकार केले. दहावीला ९६ टक्के, बारावीला ९७ टक्के मिळवत तिने अभ्यासात सातत्य राखले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 08, 2026 | 03:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • वडिलांचे स्वप्न केले साकार!
  • अभ्यासात इतकी हुशार की दहावीला पोरीने ९६ टक्के मिळवले
  • . कधी मेन्समध्ये नापास तर कधी मुलाखतीतून बाहेर
प्रत्येकाचे काहीना काही स्वप्न असते कुणाला डॉक्टर बनायचे असते तर कुणाला अभियंता! कुणाला आणखीन काही दुसरं! पण त्यातील काही असे असतात ज्यांना स्पर्धा परीक्षा पार करायची असते. देशसेवेचे वेड त्यांना इतक्या कठीण परीक्षांना सहज पार करण्याचे बळ देते. अशीच काहीशी कथा मुद्रा गैरोला हीची आहे.

ना IIT, ना जॉब स्विच! टियर-3 कॉलेजच्या इंजिनिअरने २ वर्षांत २५ हजारांवरून २४ लाखांपर्यंत घेतली झेप

मुद्राचे वडील पाच दशकांपूर्वी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. तोच वारसा पोरीकडे आला. पण पोरीने फक्त प्रयत्न केले नाही तर वडिलांचे स्वप्न पूर्णही केले. मुद्रा एका छोट्या गावखेड्यातून येते. अभ्यासात इतकी हुशार की दहावीला पोरीने ९६ टक्के मिळवले तर पुढे बारावीला तशाच अभ्यास ठेवून ९७ टक्के मिळवले. त्यांनतर पुढच्या शिक्षणासाठी मुद्रा महाराष्ट्रात आली, येथे तिने डेंटल मध्ये गोल्ड मेडल मिळवले.

मुद्राला तिच्या वडिलांच्या स्वप्नाबाबत माहीत होते. त्यासाठी तिने डेंटलचा अभ्यास अर्ध्यातच सोडला. तिने UPSC ची तयारी सुरु केली. तिने एकदा नाही अनेकदा परीक्षा दिली. कधी मेन्समध्ये नापास तर कधी मुलाखतीतून बाहेर! पण तिने जिद्द सोडली नाही. अखेर 2021 मध्ये 165 रँकसह तिने UPSC पार केली. पण तिला IAS व्हायचे होते. त्यामुळे तिने पुन्हा प्रयत्न केले आणि 2022 मध्ये पुन्हा प्रयत्न करून IPS मुद्रा झाली IAS!

दहावी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये भरती! कसलाही वेळ दवडू नका, आताच करा अर्ज

मुद्रांच्या वडिलांनी 1975 मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती पण त्याकाळी त्यांनी Mens तर पार केली पण मुलाखतीतून ते बाहेर आले. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की त्यांच्या मुलाने ते अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे, जेणेकरून मुलांकडून का होईना पण त्यांना ती गोष्ट पूर्ण करण्याचा आनंद मिळेल. त्यामुळे मुद्राने अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. वाटेत अनेक गोष्टी आल्या, पण त्यांना बाजूला सारून, पुन्हा उभे राहून वडिलांचे स्वप्न साकार केले.

Web Title: Marathi success story of ias mudra gaurila

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • ias
  • IPS
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Recruitment 2026: यूपीएससीकडून बंपर भरती; सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
1

UPSC Recruitment 2026: यूपीएससीकडून बंपर भरती; सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?
2

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?

Civil Services Exam २०२७: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२७ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा
3

Civil Services Exam २०२७: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२७ चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला होणार प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा

UPSC Defence Exams 2026: संरक्षण दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची अंतीम तारीख पहा एका क्लिकवर..
4

UPSC Defence Exams 2026: संरक्षण दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची अंतीम तारीख पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.