MBBS-BDS प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट
‘मेडिकल समुपदेशन समिती’ने अखिल भारतीय कोट्याच्या प्रवेशासाठी असलेल्या जागांसाठी प्रवेशाच्या नोंदणीला दिलेल्या मुदतवाढीच्या पार्श्वभूमीवर, राज्य ‘सीईटी कक्षाने राज्याच्या कोट्यातील वैद्यकीय एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या नोंदणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे व ही मुदतवाढ १५ ऑगस्ट रात्री ८.०० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.
PRIF: शिक्षणापासून नोकरीपर्यंतची नवी वाट; तरुणांसाठी ‘पीआरआयएफ’चा प्रयत्न
एमबीबीएस व बीडीएसच्या अभ्यासक्रमासाठी २०२६ मध्ये जे विद्यार्थी नीट या प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झाले आहेत, ते विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करण्यास पात्र आहेत. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करण्यात यावी. तसेच कागदपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी सर्व मूळ कागदपत्रासह पडताळणी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करावे. तसेच इडब्ल्यूएसचा दावा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले इडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र जे आवश्यक आहे ते सादर करणे आवश्यक आहे. ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
सर्व कागदपत्रे अपलोड करणे अत्यावश्यक अन्यथा प्रवेश अर्ज रद्द करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणीच्या अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रे काढून ठेवणे आवश्यक आहे.
कॅपमध्ये शिल्लक राहिलेल्या जागा व संस्थाच्या असलेल्या जागा पूर्वी या संस्थास्तरावर भरल्या जात असत. यावर्षी या सर्व जागा सीईटी कक्ष ऑनलाईन पद्धतीने भरणार आहे.
एमबीबीएस/बीडीएस अभ्यासक्रमाच्या कॅप फेरीचे-१ प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक
१.प्रवेशासाठी संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाईन नोंदणी-
६ ते १५ ऑगस्ट रात्री ८.०० पर्यंत
२.ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे नोंदणी शुल्क भरणे.
(शुल्क यशस्वीपणे भरल्यानंतरच उमेदवाराला प्रक्रियेसाठी नोंदणीकृत मानले जाईल.)-
६ ते १५ऑगस्ट
रात्री १०.०० पर्यंत
३.पोर्टलवर सर्व मूळ आवश्यक कागदपत्रांची रंगीत स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे.
(आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यात अपयशी ठरलेल्या उमेदवारांचा दावा केलेल्या श्रेणीतील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही)
६ ते १५ ऑगस्ट
रात्री ११ .५९ पर्यंत
४. ऑनलाईनद्वारे दस्तऐवज पडताळणी
७ ते १७ ऑगस्ट
५.नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या अस्थायी गुणवत्ता यादींची प्रसिद्धी –१८ ऑगस्ट
६.अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी-२१ ऑगस्ट
७. ऑनलाईन पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया
२२ ते २४ ऑगस्ट
सायंकाळी ५.३० पर्यंत
८.पहिली जागावाटप यादीची प्रसिद्धी —-२५ ऑगस्ट
IIT Delhi AI Course: AI क्षेत्रात करिअरची संधी! IIT Delhiच्या नव्या कोर्सेससाठी असा करा अर्ज

