फोटो सौजन्य - Social Media
पावसाळ्याचा हंगाम सुरु आहे. या दिवसात शहरी भागात पाणी साचण्याची भीती असते तर ग्रामीण डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची भीती! त्यामुळे या दिवसात लहान मुलांच्या शाळांसंबंधित अनेक निर्णय घेतले जातात. दरम्यान, पावसाचा वाढत जोर लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दीड महिना शाळांपासून सुट्ट्या देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर फार वाढलेला दिसून आला आहे. याचा फटका पाटण, माहबळेश्वर तसेच जावळी या ठिकाणांवर पडलेला दिसून येत आहे. येथील शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना या पावसाचा फार त्रास होत आहे. दरम्यान, येथे भूस्खलन होण्याची भीतीही फार आहे. अनेक घटना घडल्या आहेत. याची भीती लक्षात घेता, सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर तसेच जावळी या तीन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात या तिन्ही तालुका क्षेत्रातील एकूण ३३४ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे.
पाटण, महाबळेश्वर तसेच जावळी तालुक्यातील या शाळा १२ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत. मुळात, पाटण तालुक्यातील १८६ जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा १२ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहेत. पावसाचा सर्वात मोठा फटका पाटण तालुक्यातील प्राथमिक शाळांवर झालेला दिसून येत आहे. तर महाबळेश्वर तालुक्यातील एकूण ११८ जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा बंद राहतील. तर जावळी तालुक्यातील फक्त ३० शाळांना फटका बसणार आहे, असे सातारा जिल्ह्यातील एकूण ३३४ जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळा या काळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना पावसाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
मुळात, पावसाळी सुट्ट्या जाहीर झाल्यामुळे अनेकांना येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी प्रश्न पडला असेल, तर महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणच्या या शाळांना पावसाळी सुट्टी लक्षात घेता उन्हळ्यात कोणत्याही प्रकारची सुट्टी देण्यात येत नाही. एकंदरीत, या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी नसतेच. पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्या सुट्ट्या पावसाळ्याच्या दिवसात दिली जाते.