Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Exam : एमपीएससी परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी; लाखो परीक्षार्थी संभ्रमात

एमपीएससी परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी होणार असल्यामुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परिक्षार्थी परीक्षेच्या तारखेच्या निश्चिततेकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 02, 2025 | 02:51 PM
एमपीएससी परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी; लाखो परीक्षार्थी संभ्रमात

एमपीएससी परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी; लाखो परीक्षार्थी संभ्रमात

Follow Us
Close
Follow Us:
  • एमपीएससी परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी
  • लाखो परीक्षार्थी संभ्रमात
  • परीक्षेमार्फत भरण्यात येणारी पदे कोणती?
पुणे/सोनाजी गाढवे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ‘ब’ (अराजपत्रित) परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी नियोजित केली आहे. मात्र याच दिवशी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याची घोषणा झाल्याने, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

एकाच दिवशी दोन्ही महत्त्वपूर्ण शासकीय उपक्रम राबवावे लागणार असल्याने परीक्षा केंद्रावरील सुरळीत व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, कर्मचारी उपलब्धता आणि वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर गुंतणार असल्याने एमपीएससी परीक्षेच्या व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एमपीएससी परीक्षा सतत पुढे ढकलल्या जातात आणि वेळेवर होत नाहीत. २१ डिसेंबरला नगरपरिषद निकाल आणि त्याच दिवशी संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परीक्षा होणार की पुढे जाणार आयोगानं तात्काळ स्पष्टता द्यावी. -सुदर्शन खरात, परीक्षार्थी

दरम्यान, एमपीएससी दिशेने अद्याप यासंदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे लाखो परिक्षार्थी परीक्षेच्या तारखेच्या निश्चिततेकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत आहेत.

एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ‘ब’ २०२५ (अराजपात्रित) ही परीक्षा २१ डिसेंबरला होतं आहे, अशातच आज होणारी नगरपरिषद व नगरपंचायतची मतमोजणी आत्ता २१ डिसेंबरला होणार आहे, त्यामुळे २१ डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याचंवेळी होणार की पुढे जाणार याबद्दल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. -महेश घरबुडे, अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

परीक्षेमार्फत भरण्यात येणारी पदे

सहायक कक्ष अधिकारी – ०३ पदे
राज्य कर निरीक्षक – २७९ पदे
पोलीस उपनिरीक्षक – ३९२ पदे

विद्यार्थ्यांसाठी अनिश्चितता हीच सर्वात मोठी अडचण आहे. म्हणूनच आयोगाने २१ डिसेंबरच्या संयुक्त गट-ब परीक्षेबाबत लवकर स्पष्ट करुन निर्णय घ्यावा आणि ती फार अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू नये. -ओंकार गडवेकर, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

Web Title: Mpsc exam and counting of votes will be held on the same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • Election News
  • Election Result
  • MPSC Exam

संबंधित बातम्या

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी
1

PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी

PMC Election Result : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले
2

PMC Election Result : पूर्व पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; भाजपचे कमळ फुलले

Pune Municipal Election : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी
3

Pune Municipal Election : पुण्यात भाजपची जोरदार मुसंडी; प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून सुभाष नाणेकर विजयी

Solapur Municipal Result : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी
4

Solapur Municipal Result : राज्यातील सर्वात धक्कादायक निकाल! भाजपची महिला उमेदवार तुरुंगातून विजयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.