Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

पुणे विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांना शिवसेनेने (शिंदे गट) पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 18, 2026 | 11:39 AM
शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

Follow Us
Follow Us:
  • शिंदेसेनेचा प्रा. सचिन सानप यांना पाठिंबा
  • पुणे शिक्षक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली
  • ‘नंदनवन’वरील बैठकीनंतर राजकीय घडामोडींना वेग
पुणे : पुणे विभाग शिक्षक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांना शिवसेनेने (शिंदे गट) पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असताना शिंदेसेनेने सानप यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी १३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री झालेल्या बैठकीला सानप उपस्थित असल्याचा व्हिडिओसमोर आल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर शिंदेसेनेने सानप यांना पाठिंबा दिल्याने पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

 

या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे ही जागा भाजपसाठी मोकळी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होईल, असे मानले जात होते. मात्र, शिंदेसेनेने अपक्ष सानप यांना पाठिंबा दिल्याने भाजपच्या रणनीतीपुढे नवे आव्हान उभे राहिले आहे.

प्रा. सचिन सानप यांची ओळख प्रामुख्याने शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे आहे. त्यांनी पुण्यातील नवरोजी वाडिया महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तसेच वाडिया आणि मॉडर्न महाविद्यालयांच्या विश्वस्तपदाशीही त्यांचा संबंध राहिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारे सानप यांचा शैक्षणिक क्षेत्रातील संपर्क आणि विविध राजकीय नेत्यांशी असलेले संबंध त्यांच्या उमेदवारीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत.

सानप यांना पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेची मदत मिळण्याची शक्यता

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षीय ताकदीबरोबरच उमेदवाराचा वैयक्तिक संपर्क, शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका आणि संघटनात्मक बांधणीला महत्त्व असते. शिंदेसेनेचा पाठिंबा मिळाल्यामुळे सानप यांना पक्षाच्या संघटनात्मक यंत्रणेची मदत मिळण्याची शक्यता आहे. माघार घेतलेले मंगेश चिवटे आणि शिवसेनेचे पदाधिकारी सानप यांच्या प्रचारात किती सक्रिय होतात, याकडेही लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यासमोर मित्रपक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे आव्हान निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे कोट्यवधींची फसवणूक, आंतरराष्ट्रीय टोळीवर मकोका; डॉक्टरांसह सीए-इंजिनिअरचाही समावेश

मतांचे विभाजन झाल्यास निकालावर परिणाम होणार

या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने पहिल्या पसंतीच्या मतांबरोबरच पुढील पसंतीची मतेही निर्णायक ठरू शकतात. प्रमुख उमेदवारांमध्ये मतांचे विभाजन झाल्यास त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सानप यांना मिळालेल्या पाठिंब्यामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे गणित बदलणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष म्हणून उभे राहिलेले सानप आता शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे अधिक चर्चेत आले आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची दिशा तसेच शिक्षक मतदारांचा कल याकडे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघात शिवसेनेने कोणाला पाठिंबा दिला आहे?

    Ans: शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांना पाठिंबा देण्यात आला आहे.

  • Que: भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघातून कोणाला उमेदवारी दिली आहे?

    Ans: भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे.

  • Que: प्रा. सचिन सानप यांच्या उमेदवारीची चर्चा का वाढली?

    Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीला सानप उपस्थित असल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर शिंदेसेनेने त्यांना पाठिंबा दिल्याने राजकीय चर्चेला वेग आला.

Web Title: Eknath shindes shiv sena has announced its support for sachin sanap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Election News

संबंधित बातम्या

Drought Hit Farmers Diwali 2026:  शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
1

Drought Hit Farmers Diwali 2026: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?
2

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
3

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
4

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.