Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Exam: पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत मोठे बदल; व्ही.राधा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

MPSC Exam Reforms : स्पर्धा परीक्षा घेण्याची मूलभूत जबाबदारी आयोगाचीच राहावी, मात्र ती पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियम व पद्धती निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 13, 2026 | 08:56 AM
mpsc

mpsc

Follow Us
Follow Us:

पुणे,सोनाजी गाढवे

MPSC Exam Reforms : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांमध्ये पेपरफुटीला पूर्णविराम देण्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई, वाहतूक आणि वितरण या चारही टप्प्यांमध्ये मूलभूत बदल करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिकाच नसल्या, तर पेपरफुटीचा धोकाही राहणार नाही.त्यामुळे आयत्या वेळी प्रश्नपत्रिका निर्माण करण्याचे सूत्र निश्चित करण्यात आल्याचे राज्यातील भरती परीक्षा सुधारणांसाठी गठीत उच्चस्तरीय कृती समितीच्या अध्यक्ष आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रश्नपत्रिकेच्या संपूर्ण प्रवासात कोणत्याही एका व्यक्तीला किंवा यंत्रणेला पूर्ण माहिती उपलब्ध होणार नाही, अशा पद्धतीची सुरक्षित व्यवस्था उभारण्याची तयारी सुरू आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे.

यावेळी उच्चस्तरीय समितीचे पोलीस महासंचालक (डीजीपी), सदानंद दाते, महिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमता सचिव (आयटी आणि एआय) सदस्य वीरेंद्र सिंह, नाशिक विभागीय आयुक्त (सदस्य) डॉ. प्रवीण गेडाम, एअर मार्शल (निवृत्त), (सदस्य) अजित भोसले, केंद्रीय लोकसेवा आयोग माजी सदस्य (सदस्य) प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, आयआयटी मुंबई प्राध्यापक (सदस्य) प्रा. श्यामप्रसाद करगड्डे, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग सचिव डॉ. एन. रामास्वामी उपस्थित होते.

व्ही. राधा यांनी सांगितले की, आता पर्यंत विद्यार्थ्यांनी एमपीएससीची परीक्षा पद्धती किमान पाच ते आठ वर्षे स्थिर राहावी, वस्तुनिष्ठ, वर्णनात्मक अथवा अन्य पद्धतीत वारंवार बदल करण्याऐवजी यूपीएससीच्या धर्तीवर स्थिर आणि पूर्वनियोजित परीक्षा पद्धती असावी, परीक्षांच्या वेळापत्रकात सातत्य असावे, एकदा परीक्षा दिनदर्शिका जाहीर केल्यानंतर त्यात वारंवार बदल झाल्यास वयोमर्यादा, वयोमर्यादा सवलत आणि उमेदवारांच्या तयारीवर परिणाम होतो. त्यामुळे परीक्षांच्या तारखा निश्चित करून त्यानुसार दरवर्षी परीक्षा घेण्यात याव्यात, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.

आयोगालाच अधिक सक्षम करण्याची गरज

एमपीएससीवर परीक्षांचा वाढता भार पाहता आयोगाची संस्थात्मक क्षमता वाढविणे आवश्यक आहे. मनुष्यबळ, संगणक व तांत्रिक सुविधा, परीक्षा केंद्रांची व्यवस्था आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत समिती शिफारसी करणार आहे. परीक्षा घेण्याची मूलभूत जबाबदारी आयोगाचीच राहावी, मात्र ती पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक नियम व पद्धती निश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. असे व्ही राधा यांनी सांगिलते.

विद्यार्थ्यांचे १८ हजारांहून अधिक ई-मेल

राज्यभरातून आतापर्यंत सुमारे १८ हजारांहून अधिक ई-मेल प्राप्त झाले असून, पुण्यात आयोजित संवादादरम्यान सुमारे २०० विद्यार्थ्यांच्या सूचना नोंदविण्यात आल्या. आणखी सुमारे २०० हून आधिक विद्यार्थी चर्चेसाठी प्रतीक्षेत आहेत आणि त्याच्या सुचना जाणून घेतल्या जातील, असे व्ही. राधा यांनी सांगितले.

ओएमआर पद्धतीने परीक्षा

आगामी एक वर्ष एमपीएससीच्या परीक्षा ओएमआर पद्धतीनेच घेण्याच्या दिशेने काम केले जाणार आहे. ऑनलाइन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या मतभेदांचा विचार करून सध्या ओएमआर पद्धतीची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी आवश्यक प्रणाली विकसित केली जाणार आहे. असे व्ही राधा यांनी सांगितले.

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?

विद्यार्थ्यांनी सुचना सुचवल्या……

  • किमान पदसंख्या जाहीर करण्याची मागणी
  • उत्तरपत्रिका तपासणीसाठी केंद्रीय यंत्रणा असावी
  • एकदाच नोंदणी, शुल्क पद्धतीत सुधारणा करावी
  • तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल असावे
  • परीक्षा केंद्रांवर मूलभूत सुविधा असाव्यात
  • दिव्यांग आणि क्रीडा प्रवर्गातील प्रमाणपत्रांची तपासणी लवकर करण्यात यावी.
  • पेपरफुटी आणि गैरप्रकारांना शून्य सहनशीलता असावी
  • परीक्षा वेळेत घेणे आवश्यक

सदानंद दाते सदस्य, पोलीस महासंचालकांची प्रतिक्रिया

स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक, कोचिंग क्लास संचालक आणि पालकांच्या सूचना जाणून घेणे हा या टास्क फोर्सचा मुख्य उद्देश आहे. पुण्यातून पहिल्या सार्वजनिक सुनावणीला सुरुवात झाली असून, प्राप्त होणाऱ्या प्रत्येक सूचनेचा गांभीर्याने विचार करून परीक्षा प्रक्रिया अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे दाते म्हणाले.

Smallest University: जगातील सर्वात छोटे युनिव्हर्सिटी कॅम्पस! जिथे आहेत फक्त ३ क्लासरूम्स, तरीही येथे….

राज्यातील भरती परिक्षांच्या प्रक्रियेत काही तातडीचे बदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ दिवसांमध्येही काही शिफारसी करण्यात येतील. तर दिर्घकालीन बदल टप्प्याटप्प्याने करण्यात येतील. ही समिती केवळ अहवाल सादर करणार नाही. तर भरती प्रक्रिया गतीमान आणि अधिक पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Web Title: Mpsc exam reforms paper leak prevention v radha committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Exam
  • MPSC
  • MPSC Paper Leak

संबंधित बातम्या

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
1

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?
2

लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! CSIR UGC NET चा स्कोअर कार्ड आणि रँक जाहीर, कसा तपासाल तुमचा निकाल?

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..
3

परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठी मोठी बातमी! FMGE Exam २०२६ चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज..

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी
4

Rohit Pawar: MPSC अध्यक्षपदी तुकाराम मुंढे किंवा व्ही. राधा यांची नियुक्ती करा; रोहित पवारांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.