एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच...; प्रताप सरनाईक यांचा निर्णय
MSRTC St Bus: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या सवलतींचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (MSRTC St Bus)
मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची कार्ड नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्या व सूचनांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
अकोल्यात एसटीच्या UPI तिकीटाला प्रवाशांची पसंती; 18917 प्रवाशांनी केला यूपीआयचा वापर
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचली नसल्याने त्या अद्याप स्मार्ट कार्डपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे.
ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेद्वारे ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांची १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.
महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या आणि ग्रामीण भागात कार्ड नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंत्यांचा सकारात्मक विचार करून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड नसतानाही उद्या, ७ नोव्हेंबर २०२६ पासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे कार्ड नोंदणी अद्याप पूर्ण न झालेल्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी आपले एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतींच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. विशेष नोंदणी मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड पोहोचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी
Ans: एनसीएमसी कार्डची सक्ती ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. १ जानेवारी २०२७ पासून कार्ड अनिवार्य होणार आहे.
Ans: एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
Ans: होय. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पात्र प्रवाशांना पूर्वीप्रमाणे आवश्यक ओळखपत्र दाखवून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.






