Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गरजू विद्यार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन

राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 09, 2026 | 06:51 PM
गरजू विद्यार्थ्यांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन
Follow Us
Follow Us:
  • गरजूंना मिळणार शासकीय योजनांचा लाभ,
  • ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन
राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवार दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता बृहन्मुंबई म.न.पा. मराठी शाळा क्र.2, ना.म. जोशी मार्ग, लोअर परेल मोनोरेल स्टेशनजवळ, मुंबई येथील शिवडी विधानसभा निवडणूक कार्यालय, तळ व पहिला मजला येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांना, महिलांना, दिव्यांगांना तसेच उपलब्ध नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे अर्ज भरून त्याची तिथेच पूर्तता करण्यात येवून दाखले वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहरचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिराचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री, महापौर, आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

शिबिरातील प्रमुख उपक्रम

या शिबिरात महसूल विभागासह महाराष्ट्र शासनाच्या इतर विविध विभागांचे अंदाजे 40 स्टॉल्स लावण्यात येणार असून यामध्ये उत्पन्न दाखला, तात्पूरता रहिवास दाखला, जेष्ठ नागरिक दाखला, जातीचा दाखला, अधिवास दाखला, आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमिलेअर दाखल्यांचे जागेवरच वाटप करण्यात येणार आहे.

PCM CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना जाहीर; ‘या’ तारखेला सुरू होणार परीक्षा

शिधा पत्रिकाः

नवीन शिधा पत्रिका मिळवणे, नाव कमी करणे किंवा वाढवणे याबाबतचे अर्ज स्वीकारून कार्यवाही, तसेच लाभार्थीना शिधा वाटप करणे.

योजनांची माहिती : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती व नोंदणी करणे.

आधार कार्डः आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष कक्षाची व्यवस्था.कामगार विभाग, महिला व बाल कल्यान विभाग, समाज कल्यान विभाग, टपाल विभाग, विधी व न्याय विभाग, शिक्षण विभाग, आर्थिक विकास महामंडळ, नशाबंदी महामंडळ अशा विविध विभागांमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे.

नागरिकांनी परिपूर्ण सादर केलेल्या अर्जावर एकाच दिवसात दाखले देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता 10 वी व इयत्ता 12 च्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता देण्यात येऊन या शिबिरांचे सर्वांकरिता अयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये संजयगांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे लाभ तसेच भूमापन व भूमिअभिलेख अंतर्गत मिळणाऱ्या सेवांचा सुध्दा समावेश करण्यात येणार असून इतर विभागांशी सुध्दा समन्वयाव्दारे विविध सेवांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

परदेशस्थ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली; विद्यार्थी आर्थिक संकटात

Web Title: Mumbai news the needy will get the benefits of government schemes samadhan camp organized under chhatrapati shivaji maharaj maharajswa abhiyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.