
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
WhatsApp चा भारतात मोठा धमाका! 24 तास बिझनेस चालवण्यासाठी ‘Meta Business Agent AI’ ची घोषणा
शेअर बाजारात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान झाले आहे. गुंतवणूकदारांची एकूण गुंतवणूक मंगळवारी 480.20 लाख ितकी होती ती आज ₹८.५६ लाख कोटींनी कमी होऊन ₹४७१.६४ लाख कोटींवर आली आहे. दुपारच्या सत्रात, इंटरग्लोब एव्हिएशन, एचयूएल, मारुती सुझुकी, आयटीसी, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, आरआयएल, अल्ट्राटेक सिमेंट आणि ॲक्सिस बँक यांसारखे सेन्सेक्समधील शेअर्स ५ टक्क्यांपर्यंत घसरले. हे सर्व शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
बुधवारी दुपारी २:३० पर्यंत भारतीय शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स दिवसभरात जवळपास १,९०० अंकांनी घसरला आणि अखेरीस तब्बल १,८७८.२६ अंकांच्या घसरणीसह ७६,३०२.४६ अंकांवर बंद झाला. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आणि निफ्टी ५० देखील २४,००० च्या पातळीच्या खाली घसरला.
“Its over, don’t want to deal with them, they’re scum,” Trump signals curtains for US-Iran peace deal as tensions spiral in West Asia Read @ANI Story | https://t.co/BYIVNO4oCw#UnitedStates #Trump #Iran #PeaceDeal #WestAsiaConflict pic.twitter.com/WuU9PH3wXT — ANI Digital (@ani_digital) July 8, 2026
काल रात्री इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा वाढला. रात्रभर दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा शस्त्रसंधी करार संपल्याची घोषणा करताच, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही वाढल्या. ब्रेंट क्रूडच्या किमती रातोरात ६ टक्क्यांनी वाढून ७८ डॉलरवर पोहोचल्या. याचा परिणाम भविष्यात इतर देशांमध्येही जाणवू शकतो. सध्या सर्वांचे लक्ष होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आहे. जर होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, तर भारतासह इतर देशांतील लोकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसू शकतो. लोकांना अलीकडेच काहीसा दिलासा मिळाला होता, पण आता परिस्थिती पुन्हा सामान्य झाली आहे.