Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kotwal Recruitment 2026: रायगडमधील मुरुड तालुक्यात कोतवाल पदांची भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Murud Kotwal Recruitment 2026: रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या ११ जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 12, 2026 | 11:31 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Murud Kotwal Recruitment 2026:  महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार आणि मुरुड तालुक्यातील रिक्त पदे भरण्यासाठी विशेष मान्यता मिळाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात महसूल सेवक (कोतवाल) संवर्गाच्या सरळसेवा भरती २०२६ चा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ११ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाणार असून, यामध्ये सामाजिक व समांतर आरक्षणाचा समावेश आहे.

या जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २, भटक्या जमाती (ब) साठी १, एस.ई.बी.सी. (SEBC) साठी २, इतर मागासवर्गीय (इ.मा.व.) साठी २, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) २ आणि खुला/अराखीव प्रवर्गासाठी ४ पदे अशी एकूण ११ पदे भरली जाणार आहेत. या पदांच्या संख्येमध्ये किंवा आरक्षणामध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पात्रता आणि अटी:

उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा आणि त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास (अर्थात ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी) सर्व प्रवर्गातील उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. महसूल सेवक (कोतवाल) हे पद अवर्गीकृत असल्यामुळे सामाजिक, आर्थिक व महिला आरक्षण वगळता इतर कोणत्याही प्रकारचे वयोमर्यादेतील शिथिलता लागू असणार नाही. अर्जदार उमेदवार हा मुरुड तालुक्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत आणि शुल्क:

इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज तहसीलदार मुरुड यांच्या कार्यालयातून ५० रुपये रोख शुल्क भरून प्राप्त करून घ्यावा. अर्ज भरताना सोबत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२६ असून, कार्यालयीन वेळेत हे अर्ज प्रत्यक्ष तहसील कार्यालय मुरुड येथे सादर करायचे आहेत. टपाल किंवा ईमेलद्वारे पाठवलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३०० रुपये परीक्षा शुल्क रोख स्वरूपात जमा करावी लागेल.

UPSC 2027 चे कॅलेंडर जाहीर! IAS/IPS होण्यासाठी किती महिन्यांचे करेंट अफेयर्स वाचावे? जाणून घ्या

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: १७ ऑक्टोबर २०२६
  • अर्ज छाननीचा कालावधी: १८ ऑक्टोबर ते ०१ नोव्हेंबर २०२६
  • प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख: ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२६ (तहसील कार्यालय मुरुड येथून प्राप्त करणे)
  • लेखी परीक्षा: १५ नोव्हेंबर २०२६
  • निकाल व उत्तरसूची घोषणा: १६ नोव्हेंबर २०२६
  • दस्तऐवज पडताळणी: १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२६
  • नियुक्तीपत्र वाटप: २८ नोव्हेंबर २०२६
MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी तहसील कार्यालय मुरुड किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय अलिबाग येथील नोटीस बोर्डाशी संपर्क साधावा.

Web Title: Murud kotwal recruitment 2026 raigad bharti sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Contract Basis Job
  • Job
  • Kotwali

संबंधित बातम्या

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
1

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे
2

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
3

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार
4

PCMC News: डॉक्टरांसाठी खूशखबर! वायसीएम रुग्णालयातील प्राध्यापक पदांची भरती; मुलाखतीपूर्वी कागदपत्र पडताळणी होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.