
teacher
ज्या उमेदवारांनी सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज केले आहेत. त्यांनी दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ ते ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंत कागदपत्रे सादर करायची आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेसंबधी पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथील संत तुकारामनगर परिसरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयतील पदव्युत्तर संस्था, चाणाक्य कार्यालयातील पहिला मजला येथे कागदपत्रे सादर करावयाची आहेत.
१. उमेदवारांनी ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत आणि त्यासोबत सर्व शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, प्रकाशन प्रत आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांसह त्यांची एक साक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे.
२. अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार वयोमानाचा दाखला, आधार कार्ड, एसएससी/एचएससी प्रमाणपत्र, पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे, वैद्यकीय परिषदेची (MMC) नोंदणी व नूतनीकरण, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्रे, संशोधन प्रकाशने आणि इतर पात्रतेची कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.
३. जाहिरात क्र. १५३/२०२६ अंतर्गत अर्ज केलेल्या सर्व पात्र उमेदवारांनी वरील कालावधीत आपली कागदपत्रे विहित स्थळी जमा करून मुलाखतीकरिता निर्धारित केलेल्या तारखेस समक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन अधिक्षता डॉ. राजेंद्र बावळे यांनी केले आहे.