फोटो सौजन्य- सोशल मीडिया
SSC Exam 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या तीन प्रमुख भरती परीक्षांचे प्रस्तावित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये ज्युनिअर इंजिनिअर (JE), दिल्ली पोलीस व सीएपीएफ (CPO) सब-इन्स्पेक्टर आणि सीएचएसएल (CHSL – 10+2) या परीक्षांचा समावेश आहे. सध्या या तिन्ही परीक्षा मिळून एकूण ६,१५५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.
१. एसएससी ज्युनिअर इंजिनिअर परीक्षा २०२६ (SSC JE Paper-I):
परीक्षा तारीख: २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०२६
एकूण जागा: १,७४८ जागा (विविध केंद्रीय सरकारी संस्था आणि हवामान विभागातील सायंटिफिक असिस्टंट पदे).
२. एसएससी सीपीओ परीक्षा २०२६ (SSC CPO – SI in Delhi Police & CAPFs):
परीक्षा तारीख: २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६
एकूण जागा: १,८७१ जागा (दिल्ली पोलीस, सीएपीएफ आणि सीआयएसएफमधील सब-इन्स्पेक्टर पदे).
३. एसएससी सीएचएसएल परीक्षा २०२६ (SSC CHSL Tier-I):
परीक्षा तारीख: ३० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६
एकूण जागा: २,५३६ जागा (लोअर डिव्हिजनल क्लर्क/ज्युनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदे).
आयोगाने स्पष्ट केले आहे की, जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या तारखा आणि रिक्त जागांचे प्रमाण प्रस्तावित (Tentative) आहे. भविष्यात परिस्थितीनुसार यामध्ये बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी या तारखांना लक्षात घेऊन आपली तयारी जोमाने सुरू ठेवावी आणि अधिकृत वेबसाईटवरील नवीन सूचनांवर सतत लक्ष ठेवावे.






