Turmeric Crop Damage
यंदा बाजारपेठेत हळदीचे वाढते भाव पाहून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने हळद लागवडीचा निर्णय घेतला. पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानेही परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची आशा कायम होती. परतीचा पाऊस होऊन जमिनीतील ओलावा वाढेल आणि पाण्याची कमतरता भरून निघेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले.
हळदीचे पीक जोपासण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जवळपास एक ते दीड लाख रुपये एकरी खर्च केला. वाढत्या बाजारभावामुळे उत्पादनातून चांगला आर्थिक फायदा होईल, अशी अपेक्षा होती. आता जिल्ह्यातील अनेक भागांतील बोरवेल, विहिरी, नदी आणि तलाव कोरडे पडल्याने हळदीला पाणी देणे अशक्य झाले.
मंगरूळपीर तालुक्यातील कंझरा हे गाव हळद लागवडीसाठी महत्त्वाचे ठरत आहे. या एकाच गावात जवळपास २०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली. मात्र, यापैकी तब्बल १०० एकर क्षेत्रातील हळद पाण्याअभावी सुकून जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जवळपास निम्म्या हळद क्षेत्राचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी केलेला मोठा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. हळद लागवडीसाठी कर्ज काढून आणि पदरमोड करून लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षा हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
शिवसेनाचे सामाजिक कार्यकर्ते, शिवा सावके म्हणाले की, हळद लागवडीसाठी केले आपल्या मुलाबाळा सारखे संगोपन केलेल्या हळदीला आज पाणी उपलब्ध नसल्यामुळे वाळताना पावल्या जात नाही. चांगले उत्पन्न व्हावे यासाठी कर्ज काढून आणि पदरमोड करून लाखो रुपये खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने विशेष मदतीचे पॅकेज जाहीर करावे.
कंझराचे हळद उत्पादक शेतकरी, विष्णू गावंडे म्हणाले की, मोठ्या आशेने यावर्षी हळदीचे पीक लावले होते परंतु बोरवेल विहिरी यांनी तळ गाठला यामुळे हळदीला पाणी उपलब्ध करणे आता शक्य होत नाही. हळदीची सुकलेली अवस्था पाहून आमच्या डोळ्यात पाणी येते, आतापर्यंत लाखो रुपये खर्दून या हळदीचे संगोपन करण्यात आले होते. परंतु, पाणी नसल्यामुळे आमचा कुठलाही इलाज चालत नाही. संबंधित सरकारने हळद उत्पादक शेतकऱ्याला भरीव मदत द्यावी, अशी मागणी आम्ही सरकार दरबारी करत आहोत.
Ans: अल्प पाऊस आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पीक वाळले.
Ans: जवळपास २०० एकर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली.
Ans: सुमारे १०० एकर क्षेत्रातील हळद पाण्याअभावी वाळली आहे.






