Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचा अंत पाहिला; ३० तासांपासून हजारो नागरिक रस्त्यावर अडकले

Satara News : ऊसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपयांची पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावर ३० तासांपासून वाहतूक ठप्प आहे. हजारो प्रवासी अडकले असून, पाणी-अन्नासाठी त्यांची वणवण सुरू आहे. वाढत्या संतापातून पोलिसांशीही शाब्दिक चकमक झाली.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 04, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • ऊसदराच्या मागणीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • कोंडीचा फायदा घेत विक्रेत्यांकडून पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढवले
  • वाहनचालकांचा संताप पोलिसांवर; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Satara News : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका आता सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सलग ३० तासांपासून ठप्प झाली आहे.

हजारो प्रवासी आणि वाहनचालक रस्त्यावरच अडकून पडल्याने त्यांचे प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अन्न-पाण्याविना तासन्तास थांबावे लागत असल्याने प्रवाशांचा संताप वाढला असून, काही ठिकाणी पोलिसांशीही शाब्दिक चकमक झाली.

ऊसदराच्या मागणीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपयांची पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एक हजारांहून अधिक वाहने अडकून पडली आहेत. अवजड वाहने, खासगी मोटारी आणि प्रवासी वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. अनेकांना इच्छित स्थळी पोहोचणे अशक्य झाले असून, विशेषतः लांब पल्ल्याच्या ट्रकचालकांची अवस्था बिकट झाली आहे.

Swabhimani Farmers Protest : ऊसाला 4,500 रुपये प्रतिटन दरासाठी शेतकरी आक्रमक; पुणे-बंगळूर महामार्गावर चक्काजाम

कोंडीचा फायदा घेत विक्रेत्यांकडून पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढवले

महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानंतर प्रवाशांसमोर अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था किंवा मदत उपलब्ध न झाल्याने प्रवाशांची गैरसोय अधिकच वाढली. या परिस्थितीचा फायदा घेत काही विक्रेत्यांनी पाण्याच्या बाटल्यांचे दर वाढविल्याचा आरोप वाहनचालकांनी केला. वीस रुपयांची बाटली पन्नास रुपयांना विकली जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली.

Rajnala Right Canal : कर्जतच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! ४० गावांतील शेतीला मिळणार पाणी

वाहनचालकांचा संताप पोलिसांवर; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आंदोलनाचा प्रश्न मार्गी लागत नसताना प्रवाशांच्या मदतीसाठीही ठोस पावले उचलली जात नसल्याने वाहनचालकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिस्थिती हाताळण्यासाठी आलेल्या पोलिसांशी संतप्त वाहनचालकांची जोरदार शाब्दिक चकमक झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा विरोध नाही; मात्र त्यांच्या आंदोलनामुळे अडकलेल्या नागरिकांना पाणी, अन्न आणि सुरक्षिततेची सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा परिणाम व्यापारी मालवाहतुकीवरही झाला आहे. अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा प्रश्न आणि सामान्य प्रवाशांची होणारी परवड यांची सांगड घालत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Satara news sugarcane protest mumbai bangalore highway traffic jamcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

US Market News : डेमोक्रॅट्सच्या विजयाचा टेक कंपन्यांना फटका; स्पेसएक्स, टेस्लासह AI क्षेत्रातील शेअर्स घसरले
1

US Market News : डेमोक्रॅट्सच्या विजयाचा टेक कंपन्यांना फटका; स्पेसएक्स, टेस्लासह AI क्षेत्रातील शेअर्स घसरले

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष
2

Karanja : विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक, शेतकरी एल्गार समितीतर्फे आंदोलन; प्रशासनाचे वेधले लक्ष

US News : अमेरिकेत घडला इतिहास; अब्दुल अल -सईद ठरले सिनेटमध्ये निवडून येणारे पहिले मुस्लिम व्यक्ती
3

US News : अमेरिकेत घडला इतिहास; अब्दुल अल -सईद ठरले सिनेटमध्ये निवडून येणारे पहिले मुस्लिम व्यक्ती

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती
4

Mumbai News :घरगुती पाहुणचारात वाढतोय प्रीमियम फूड डिलिव्हरीचा ट्रेंड; खास प्रसंगांसाठी रेस्टॉरंट्सच्या जेवणाला पसंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.