Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Naval Architect Career Guide: नोकरी शोधताय? इंजिनीअरिंगनंतर ४० लाखांचे पॅकेज देणारं ‘हे’ करिअर माहितीये का?

Naval Architect Career Guide: नेव्हल आर्किटेक्ट म्हणून करिअर कसे करावे? पात्रता, पगार आणि भविष्यातील संधींची संपूर्ण माहिती या बातमीत वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 02, 2026 | 01:16 PM
Naval Architect

Naval Architect

Follow Us
Follow Us:
  • नेव्हल आर्किटेक्टचे काम काय असते ?
  • शेैक्षणिक पात्रता –
  • वार्षिक ८ ते ४० लाखांपर्यंत पॅकेज
Naval Architect Career Guide: तुमचे अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण पूर्ण झाले असून तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नेव्हल आर्किटेक्ट हा व्यवसाय करियरसाठी एक चांगला पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया याची संपुर्ण माहिती…….

नेव्हल आर्किटेक्टचे काम काय असते ?

नेव्हल आर्किटेक्टचे काम हे जहाज आणि सागरी संरचनांच्या डिजाइन व बांधकामाशी संबंधित आहे. जहाजाचा आकार वजन, त्याची क्षमता तसेच जहाज पाण्यात कसे चालेल ते किती स्थिर राहील यांकडे लक्ष देण्याचे काम नेव्हल आर्किटेक्ट करतो. याशिवाय इंधनाचा वापर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम याचा विचार करून जहाज आंतरराष्ट्रीय सुरक्षा नियमांनुसार बनवलेले आहे की नाही याची खात्री ते करतात. हे काम अत्यंत जबाबदारीचे असल्यांने यात झालेली छोटी चूक कोट्यावधीचे नुकसान करु शकते.

परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया?

या क्षेत्रात काम करणारे लोक जहाज बांधणी कंपन्या, डिझाइन ऑफिसेस, सरकारी विभाग आणि संशोधन संस्थांमध्ये काम करतात. काही लोक जहाज तयार करण्याच्या विभागात काम करतात. अनेकदा त्यांना वेगवेगळ्या देशात जाऊन प्रकल्पावर काम करावे लागते. काही लोक ऑफिसमध्ये कॉप्युटरवर डिजाइन बनवतात तर काही प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी बांधकामावर देखरेख करतात. अशा प्रकारे ही नोकरी ऑफिस आणि फिल्ड अशा दोन्ही कामांची संधी देते.

शेैक्षणिक पात्रता –

नेव्हल आर्किटेक्ट बनण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे लागते. साधारणपणे विद्यार्थी मरीन इंजिनीअरिंग किंवा नेव्हल आर्किटेक्चर (Naval architect) मध्ये पदवी घेतात. काही लोक मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगनंतरही या क्षेत्रात प्रवेश करतात. या व्यवसायाकरिता गणित, भौतिकशास्त्र आणि डिझाइनची उत्तम समज असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचेही ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.

JEE Advanced Registration 2026 Apply Last Date: आयआयटी प्रवेशासाठी अर्ज केला का? उद्या आहे शेवटची संधी!

वार्षिक ८ ते ४० लाखांपर्यंत पॅकेज

या व्यवसायात तांत्रिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवाची गरज असते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष काम समजून घेण्याकरिता इंटर्नशिप आणि ट्रेनिंग घेणे आवश्यक आहे. अनुभवानुसार या क्षेत्रात चांगल्या संधी आणि जबाबदारी मिळतात. हे लोक सीनियर डिझायन इंजिनीअर, प्रोजेक्ट मॅनेजर, संशोधन किंवा विकास क्षेत्रात जाऊ शकतात. तसेच पगाराबाबत सांगायचे झाल्यास वार्षिक ८ लाखांपर्यंत पॅकेज मिळते जे अनुभवानुसार ४० लाखांपर्यंत जाऊ शकते.

आजच्या काळात नेव्हल आर्किटेक्टचे काम अधिक महत्त्वाचे आहे, कारण सागरी व्यापार आणि जहाजांची मागणी वाढत आहे. तसेच पर्यावरण रक्षण आणि इंधन बचतीवर भर दिला जात आहे. त्यामुळे अत्याधुनिक जहाजे बनवली जात असल्याने नेव्हल आर्किटेक्टची भूमिका महत्वाची आहे.

 

Web Title: Naval architect career guide salary eligibility maritime jobs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • Career News
  • Indian

संबंधित बातम्या

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
1

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
2

शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती
3

AIIMS INI-CET 2027 मेडिकल PG प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या परीक्षा, फी अन् प्रक्रियेची संपूर्ण माहिती

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा
4

Maharashtra Board Exams 2027: 10वी – 12वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी सुरू होणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.