परदेशात एमबीए करण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या जगातील प्रथम क्रमांकाच्या बिझनेस स्कूलमधील प्रवेशाची नेमकी प्रक्रिया? /फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अलीकडच्या काही वर्षांत लाखो विद्यार्थी परदेशातून व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी (MBA) करण्याचा विचार करत असतात. पण परदेशातील नेमकं कोणत्या कॉलेजमधून किंवा विद्यापीठातून एमबीए करायचे याची माहितीच या विद्यार्थ्यांना नसते. अशातच फायनान्शियल टाइम्सने २०२६ जागतिक बिझनेस स्कूलची क्रमवारी जाहीर केली आहे. भारतातील अनेक तरुण-तरुणींनी अमेरिकेतील कैम्ब्रिज येथे स्थित या बिझनेस स्कूलमधून एमबीए करण्याचे स्वप्न पाहिले असेल. मग आता या स्कूलमधील प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे, हे आज आपण जाणून घेऊया.
फायनान्शियल टाइम्स ही संस्था दरवर्षी जगभरातील नामांकित बिझनेस स्कूल्सचे विविध निकषांवर मूल्यमापन करते. यामध्ये प्रामुख्याने पदवीनंतर मिळणारा पगार, करियमधील प्रगती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त अनुभव आणि प्लेसमेंटची आकडेवारी या घटकांचा विचार केला जातो. या सर्व निकषांची पात्रता पुर्ण करून जगातील पहिल्या क्रमांकावर एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटने नावलौकिकता मिळवली आहे.
Education News: राज्यातील ७३६ शिक्षण संस्थांना सरकारी अनुदानाची दारे बंद; राज्य सरकारचा मोठा दणका
या प्रतिष्ठीत संस्थेत प्रवेश मिळवणे सोपे नसले तरी योग्य नियोजनाने ते शक्य आहे. भारतीय विद्यार्थ्यासाठी GMAT पात्रता परीक्षेत उत्तम गुण मिळवणे ही पहिली पायरी आहे, तसेच व्यवसायिक कामाचा किमान 4 ते 6 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक संस्थेत केवळ शैक्षणिक गुणवत्ताच नव्हे तर संबंधित उद्योगाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.
या संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यांर्थ्यांच्या व्यक्तिमत्तवाला आणि नेतृत्व गुणांना अधिक महत्त्व दिले आहे. तसेच मुलाखतीदरम्यान संघाच्या नेतृत्वाची क्षमता, कठीण प्रसंगी अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आणि सर्जनशील विचार करण्याची पद्धत या गुणांची काटेकोरपणे तपासणी केली जाते.
थोडक्यात, तुम्हाला जगातील पहिल्या क्रमांकाच्या विद्यापीठातून शिक्षण घेऊन यशस्वी होण्याचे स्वप्न असेल तर आतापासून शैक्षणिक आणि व्यवसायिक कैशल्यांच्या तयारीला सुरवात करणे आवश्यक आहे.






