Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCC Benefits for Students: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

NCC Benefits for Students: एनसीसी (NCC) म्हणजे काय? त्याचे ए, बी आणि सी प्रमाणपत्र मिळवण्याचे फायदे काय आहेत? डिफेन्स आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्ये एनसीसी प्रमाणपत्राचा कसा फायदा होतो? जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 26, 2026 | 01:15 PM
ncc

ncc

Follow Us
Follow Us:

NCC Benefits for Students: शाळा-कॉलेजच्या दिवसांत खाकी किंवा ऑलिव्ह ग्रीन रंगाचा गणवेश घालून शिस्तीत मार्च करणे हे मुलांमध्ये एक वेगळा उत्साह आणि अभिमानाची भावना निर्माण करते. राष्ट्रीय कॅडेट कोर (NCC) मधील हे आकर्षण तरुणांमध्ये देशभक्ती, एकता आणि नेतृत्वाची भावना मोठ्या प्रमाणावर रुजवण्याचे काम करते. अभ्यासासोबतच एनसीसीशी जोडले जाणे हा एक रोमांचक प्रवास आहे, ज्याच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञानाशिवाय जीवनातील खरे धडे शिकायला मिळतात.

अनेकदा विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न येतो की, एनसीसी ही केवळ शाळा-कॉलेजची एक ॲक्टिव्हिटी आहे की भविष्यात करिअर घडवण्यासाठी याचा खरोखरच काही फायदा होतो? चला तर मग जाणून घेऊया की एनसीसीचे करअरचे महत्त्व नेमके काय आहे?

एनसीसी म्हणजे काय आणि यामध्ये काय करावे लागते?

एनसीसी हा शाळांमध्ये शिकवला जाणारा कोणताही नियमित अभ्यासक्रम नाही, तर तरुणांसाठीचा एक स्वेच्छिक लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आहे, ज्याचे संचालन संरक्षण मंत्रालयाकडून केले जाते.

एनसीसीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गातील अभ्यासासोबतच आठवड्यातून काही तास परेड, ड्रिल, शस्त्र चालवणे, नकाशा वाचन, आपत्ती व्यवस्थापन आणि समाजसेवा यांचे धडे दिले जातात. याशिवाय ॲडव्हेंचर कॅम्प, ट्रेकिंग आणि फायरिंग कॅम्पचा भाग बनण्याची एक सुवर्णसंधी देखील विद्यार्थ्यांना मिळते.

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

एनसीसीचे प्रमाणपत्र

एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कॅडेट्सना त्यांच्या पात्रता आणि कालावधीनुसार प्रामुख्याने ३ प्रकारचे प्रमाणपत्रे मिळतात:

ए-सर्टिफिकेट: हे शाळा स्तरावर जुनियर विंगच्या विद्यार्थ्यांना ८ वी ते १० वी दरम्यान दिले जाते.

बी-सर्टिफिकेट: हे कॉलेज किंवा वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील सुरुवातीच्या २ वर्षांच्या प्रशिक्षणानंतर प्रदान केले जाते.

सी-सर्टिफिकेट: हे एनसीसीचे सर्वात उच्च आणि महत्त्वाचे प्रमाणपत्र आहे, जे कॉलेजच्या अंतिम वर्षात कठीण परीक्षा आणि कॅम्प पास केल्यानंतर मिळते.

एनसीसीचे फायदे आणि करिअरमधील महत्त्व

एनसीसी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अनेक प्रतिष्ठित विद्यापीठे आणि महाविद्यालये प्रवेशादरम्यान एनसीसी कोट्याअंतर्गत विशेष प्राधान्य किंवा वेटेज गुण देतात. तसेच, अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी होणाऱ्या होतकरू कॅडेट्सना सरकारतर्फे आकर्षक स्कॉलरशिप देखील दिली जाते.

एका IAS Officer ला किती प्रमोशननंतर Election Commissioner पदाची जबाबदारी मिळते? जाणून घ्या

एनसीसी प्रमाणपत्रांना भारत सरकारचे संरक्षण मंत्रालय आणि विविध विभागांची अधिकृत मान्यता आहे. तुमच्याकडे एनसीसीचे ‘बी’ किंवा ‘सी’ प्रमाणपत्र असल्यास भारतीय सैन्य, नौदल, वायुदल  आणि निमलष्करी दलांच्या (CRPF, BSF) भरतीमध्ये लेखी परीक्षेदरम्यान बोनस गुण किंवा थेट सवलत मिळते. तसेच पोलिस विभाग आणि सरकारी सुरक्षा एजन्सीमध्येही एनसीसी कॅडेट्सना पहिली पसंती दिली जाते.

Web Title: Ncc benefits certificates student career guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • career guide
  • Government Job
  • Indian Air Force
  • Indian Armed Forces

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
2

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
4

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.