Volkswagen Virtus Facelift Price Announcement (फोटो सौजन्य-AI एआय)
भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय असलेल्या फोक्सवॅगन व्हर्चस फेसलिफ्टची प्रतीक्षा आता संपणार आहे. कंपनी 11 डिसेंबर 2026 रोजी या नवीन सेडानच्या किमती जाहीर करणार आहे. Volkswagen Virtus Facelift 2026 मध्ये नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, मोठे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बाह्य डिझाइनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. जून 2022 मध्ये भारतात दाखल झालेल्या या सेडानचे सुमारे साडेचार वर्षांनंतर पहिले फेसलिफ्ट येत आहे.
सध्याच्या व्हर्चसमध्ये 1.0 लिटर आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचे ऑप्शन मिळतात. यातील 999cc क्षमतेचे 1.0 TSI इंजिन 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. सध्या यासोबत 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. पण फेसलिफ्टमध्ये हा गिअरबॉक्स बदलून नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक दिला जाण्याची शक्यता आहे. हे गिअरबॉक्स फोक्सवॅगन टायगुनमध्ये एप्रिल 2026 मध्ये दाखल झाले होते. याशिवाय 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सही कायम राहू शकतो.
फोक्सवॅगनच्या पार्ट्स पुरवठादाराकडून युरोपमध्ये 3,460 कर्मचाऱ्यांची कपात; 5 साइट्स बंद होणार
दुसरीकडे, 1.5 लिटर TSI इंजिन 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देते. यामध्ये Active Cylinder Technology असल्यामुळे कमी लोडवर इंजिनमधील 2 सिलिंडर बंद होतात आणि इंधन बचतीस मदत मिळते. या इंजिनसोबत 7-स्पीड DSG गिअरबॉक्स कायम राहण्याची शक्यता आहे.
डिझाइनच्या बाबतीत नवीन व्हर्चसमध्ये फार मोठे बदल नसले तरी काही नवीन अपडेट्स मिळतील. GT व्हेरिएंटमध्ये नवीन ब्लू रंग, ब्लॅक रूफ, ब्लॅक ORVM आणि बूट स्पॉयलर दिला आहे. पुढील बंपरमध्ये डायमंड पॅटर्न ग्रिल, LED फॉग लॅम्पसाठी नवीन जागा आणि मागील बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय 16-इंच ग्लॉस ब्लॅक अलॉय व्हील्स आणि लाल ब्रेक कॅलिपर्स मिळतात. पुढील बंपरवरील कॅमेरा आणि सेन्सर्समुळे 360-डिग्री कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
फोक्सवॅगनची नवीन कॉम्पॅक्ट SUV भारतात 2027 मध्ये येणार; 19 km/l मायलेजसह मिळू शकते दमदार इंजिन
केबिनमध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले, इंटिग्रेटेड अॅप स्टोअर आणि Google Cloud आधारित व्हॉइस असिस्टंट मिळू शकतो. नवीन सीट अपहोल्स्ट्री आणि मागील सीटसाठी मसाज फंक्शनचीही चर्चा आहे. सध्याच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.71 लाख ते 19.20 लाख रुपये आहे. फेसलिफ्टनंतर किमतीत थोडी वाढ होऊ शकते. नवीन व्हर्चसची स्पर्धा स्कोडा स्लाव्हिया, ह्युंदाई व्हर्ना आणि होंडा सिटीशी असेल.
Ans: कंपनी 11 डिसेंबर 2026 रोजी Volkswagen Virtus Facelift च्या किमती जाहीर करणार आहे.
Ans: 1.0 TSI पेट्रोल इंजिनसोबत नवीन 8-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. 1.5 TSI इंजिनसोबत 7-स्पीड DSG कायम राहू शकतो.
Ans: सध्याच्या फोक्सवॅगन व्हर्चसची एक्स-शोरूम किंमत 10.71 लाख ते 19.20 लाख रुपये आहे. फेसलिफ्ट मॉडेलच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.






