Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET ची फेरपरीक्षा आज; हवाई दलाच्या मदतीने प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जाणार परीक्षा केंद्रात

सोशल प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवली जात असून, 'टेलीग्राम' अॅपवर २२ जूनपर्यंत देशभरात बंदी घालण्यात आली आहे. पेपर रद्द करण्याच्या आदेशापासून ते २१ जून या परीक्षेच्या तारखेपर्यंत घडलेल्या अनेक घडामोडींमुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 21, 2026 | 08:02 AM
NEET ची फेरपरीक्षा आज; NTA च्या चोख तयारीच्या दाव्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंतही गोंधळ

NEET ची फेरपरीक्षा आज; NTA च्या चोख तयारीच्या दाव्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंतही गोंधळ

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पेपरफुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आलेली नीट परीक्षा आज होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) या फेरपरीक्षेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. यामध्ये हवाई दलाच्या मदतीने सर्व परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षेत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रांवर सीआरपीएफ तैनात करण्यात आली असून, परीक्षार्थीच्या बायोमेट्रिक ओळखीसोबतच ‘फेस रिकग्निशन’ व्यवस्था करण्यात आली आहे.

सोशल प्लॅटफॉर्मवर कडक नजर ठेवली जात असून, ‘टेलीग्राम’ अॅपवर २२ जूनपर्यंत देशभरात बंदी घालण्यात आली आहे. पेपर रद्द करण्याच्या आदेशापासून ते २१ जून या परीक्षेच्या तारखेपर्यंत घडलेल्या अनेक घडामोडींमुळे विद्यार्थी आधीच मानसिक तणावात आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट फेरपरीक्षेत नागपूरच्या विद्यार्थ्याला अबू धाबीचे केंद्र देण्याच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले की, सरकारने मुलांच्या भविष्याशी जुगार खेळणे बंद केले पाहिजे. राहुल यांनी एक्सवर या घटनेचा उल्लेख करत संपूर्ण परीक्षा पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले.

ते म्हणाले, गेल्या महिनाभरापासून परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याला शेवटच्या क्षणी समजते की, त्याचे परीक्षा केंद्र विदेशात आहे. यामुळे तो प्रचंड मानसिक तणावाखाली आला, रात्रभर रडत राहिला आणि त्याने परीक्षा देण्यासच नकार दिला. या मानसिक त्रासाची कोणी कल्पना तरी करू शकते का? अखेर असे घडलेच कसे? उद्या कोणत्याही विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहोचू न शकल्याची तक्रार येता कामा नये.

दुपारी दोन वाजता सुरु होणार परीक्षा

नीटची ही परीक्षा २ वाजता सुरू होऊन सायं. ५:१५ वाजता संपणार आहे. यासाठी ५५१ परीक्षा केंद्रे देशभरात देण्यात आली आहेत.

विद्यार्थ्याची आत्महत्या

गाझियाबादमध्ये २२ वर्षांच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या एक दिवस आधी आत्महत्या केली आहे. हे आत्मघातकी पाऊल उचलण्यापूर्वी त्याने १ मिनिट ४ सेकंदाचा एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये त्याने आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत कॉक्रोच पार्टीची निदर्शने

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने शनिवारी जंतर-मंतर येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यादरम्यान सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, जोपर्यंत प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आम्ही जंतर-मंतरवरून हटणार नाही.

Web Title: Neet re examination today question papers to be delivered to exam centers with the help of the air force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 08:02 AM

Topics:  

  • Education Sector
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET UG Re-Exam: नीट फेरपरीक्षेसाठी NTA चा कडक ड्रेस कोड! हिजाब, बुर्का किंवा पगडी घालणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का?
1

NEET UG Re-Exam: नीट फेरपरीक्षेसाठी NTA चा कडक ड्रेस कोड! हिजाब, बुर्का किंवा पगडी घालणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार का?

NEET ची फेरपरीक्षा होणार उद्या; परीक्षा केंद्रांवर असणार खडा पहारा, 35 प्रमुख शहरांमध्ये…
2

NEET ची फेरपरीक्षा होणार उद्या; परीक्षा केंद्रांवर असणार खडा पहारा, 35 प्रमुख शहरांमध्ये…

NEET UG 2026: ‘या’ राज्यात सर्वात जास्त परीक्षा देणार विद्यार्थी, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण?
3

NEET UG 2026: ‘या’ राज्यात सर्वात जास्त परीक्षा देणार विद्यार्थी, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण?

NEET पुनर्परीक्षेआधीच आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन
4

NEET पुनर्परीक्षेआधीच आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या; 2 दिवसात 4 विद्यार्थ्यांनी संपवले जीवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.