Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: नीट परीक्षा पद्धतीत मोठे बदल होणार? पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकार काय करणार? जाणून घ्या सविस्तर!

NEET UG Exam Pattern: देशभर गाजलेल्या पेपर लीक प्रकरणानांतर केंद्र सरकारने नीट (NEET UG) परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी कोणकोणते मोठे बदल आणि नियम लागू करण्याचे संकेत दिले आहेत? जाणून घ्या सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 05, 2026 | 04:13 PM
neet ..

neet ..

Follow Us
Follow Us:

देशभर गाजलेल्या नीट पेपर लीक प्रकरणानांतर परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी केंद्र सरकार अनेक महत्त्वाची पावले उचलत आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. नीट पेपर लीक रोखण्यासाठी इंजिनिअरिंगच्या धर्तीवर दोन टप्प्यात परीक्षा आयोजित करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. सध्या वैद्यकीय प्रवेशासाठी NEET UG परीक्षा केवळ एकाच टप्प्यात होते, पण आता ती JEE प्रमाणे ‘टू-स्टेज परीक्षा’ बनवण्याची योजना आहे.

नीट परीक्षा प्रणाली सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाचे पावले उचलली असल्याचे म्हटले आहे. २०२६ मध्ये लागू झालेल्या नवीन कायद्यानुसार आता पेपर लीक आणि घोटाळ्यांसारख्या गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार, कॉपी करताना किंवा कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारात दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि ५ कोटी रुपयांपर्यंतचा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो.

NEET UG परीक्षेत कोणते नवीन बदल होऊ शकतात?

दोन टप्प्यांत परीक्षा: इंजिनिअरिंग कोर्सेससाठी जशी आधी ‘JEE Main’ आणि नंतर ‘JEE Advanced’ परीक्षा घेतली जाते, अगदी त्याचप्रमाणे आता वैद्यकीय प्रवेशासाठी NEET परीक्षा देखील दोन टप्प्यांत घेण्याच्या नियोजनावर विचार सुरू आहे.

पेन-पेपरऐवजी CBT मोड: आतापर्यंत NEET परीक्षा ओएमआर (OMR) शीटसह पेन आणि पेपर मोडवर होते. पुढच्या वर्षापासून ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने घेतली जाऊ शकते.

अनेक शिफ्टमध्ये परीक्षा: सीबीटी सोबतच ही परीक्षा एकाच वेळी आणि एकाच दिवशी घेतली जाणार नाही, तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आणि वेगवेगळ्या दिवशी NEET UG परीक्षा आयोजित करण्याचा विचार आहे.

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आरबीआयमध्ये अधिकारी कसा बनला? जाणून घ्या त्यांचे पद आणि पगाराबद्दल सविस्तर..

पेपर लीक आणि गैरव्यवहारास आळा घालण्यासाठी प्रयत्न

पेपर लीक आणि घोटाळ्यांना पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे. JEE Main, CUET, UGC-NET इत्यादी परीक्षांप्रमाणेच ही परीक्षा देखील CBT मोडमध्ये आयोजित केली जाईल, ज्यामुळे पेपर लीक रोखण्यास मदत होऊ शकते. माहितीसाठी सांगायचे तर, NTA च्या ८ मोठ्या परीक्षांपैकी केवळ NEET UG ही एकमेव परीक्षा आहे जी आजही पेन-पेपर मोडवर घेतली जाते.

ICMAI जून २०२६ चे निकाल जाहीर; यंदा कोणत्या शहरांचा राहिला दबदबा? जाणून घ्या सविस्तर..

Web Title: Neet ug exam pattern change two stage cbt mode marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • NEET Exam
  • NEET PG Exam

संबंधित बातम्या

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
1

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
2

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.