Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medical Admission Update: डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! देशात MBBS प्रवेशासाठी नवीन जागा वाढल्या

Medical Admission Update: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एनएमसीने एमबीबीएसची अधिकृत सीट मॅट्रिक्स जाहीर केली आहे. ९,९११ नवीन जागांच्या वाढीसह देशातील एकूण जागांची आणि नवीन २५ महाविद्यालयांची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 15, 2026 | 04:24 PM
mbbs

mbbs

Follow Us
Follow Us:

NMC approval Medical Admission Update: नीट यूजी २०२६ च्या (NEET UG 2026) माध्यमातून एमबीबीएसला प्रवेश घेण्याची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिलने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएस जागांची अधिकृत सीट मॅट्रिक्स जाहीर केली आहे. यामध्ये देशभरातील एमबीबीएस जागांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे.

नवीन जागांचा समावेश झाल्यानंतर आता देशातील ८२३ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण १,३६,९३९ एमबीबीएस जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यासोबतच २५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनाही मंजुरी देण्यात आली असून, ज्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचा परीघ आणखी रुंदावणार आहे. ही सीट मॅट्रिक्स नीट यूजी २०२६ च्या कौन्सिलिंगदरम्यान प्रवेशाचा मुख्य आधार ठरेल.

९,९११ नवीन जागा वाढल्या; एकूण जागा १.३६ लाखांच्या पार

एनएमसीच्या ‘मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड’च्या (MARB) माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी देशभरात एकूण १,३६,९३९ एमबीबीएस जागा उपलब्ध असतील. यामध्ये १,२७,०२८ आधीच मंजूर झालेल्या जागा आहेत, तर या वर्षी ९,९११ नवीन जागांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय, २५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २,४०० नवीन जागाही जोडण्यात आल्या आहेत.

शासकीय आणि खासगी दोन्ही महाविद्यालयांमध्ये जागा वाढल्या

या वेळी शासकीय आणि खासगी दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांची संख्या वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये देशातील ४४१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत आता एकूण ६३,२९६ जागा उपलब्ध असतील. यामध्ये २,१११ नवीन जागा जोडण्यात आल्या आहेत. तर देशातील ३८२ खासगी महाविद्यालयांमध्ये एकूण ७३,६४३ जागा उपलब्ध आहेत, यामध्ये यंदा ७,८०० जागांची वाढ करण्यात आली आहे.

City of Flags: भारतातील ‘या’ शहराला का म्हटले जाते झेंड्यांचे शहर? जाणून घ्या तिरंग्याचा अनोखा इतिहास…

२५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांनाही मिळाली मंजुरी

एनएमसीने या शैक्षणिक सत्रासाठी २५ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली असून त्यांच्या जागांमध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, नॅशनल मेडिकल कौन्सिलने स्पष्ट केले आहे की, सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना केवळ अधिकृत मंजुरी मिळालेल्या जागांवरच प्रवेश द्यावा लागेल. कोणत्याही महाविद्यालयाला मंजूर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची परवानगी नसेल. जर एखाद्या संस्थेच्या जागांमध्ये पुढे कोणताही बदल झाला, तर एमएआरबी सुधारित आदेश जारी करेल आणि नवीन सीट मॅट्रिक्स अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.

US Army Recruitment: भारतीयांना अमेरिकन स्पेशल फोर्समध्ये नोकरी मिळू शकते का? जाणून घ्या लष्कराचे काय आहेत कडक नियम…

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ७ दिवसांची मुदत

ज्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना या वर्षी नवीन संस्था सुरू करण्याची किंवा जागा वाढवण्याची मंजुरी मिळाली आहे, त्यांना ७ दिवसांच्या आत इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जमा करावी लागेल. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आणि कागदपत्रांच्या यशस्वी पडताळणीनंतर ‘मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड’ संबंधित संस्थांना ‘लेटर ऑफ परमिशन’ जारी करेल.

‘या’ राज्यांमध्ये वाढल्या सर्वाधिक एमबीबीएस जागा

नवीन जागांच्या वाटपामध्ये देशातील अनेक राज्यांना मोठा फायदा झाला आहे. ज्यामध्ये कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

Web Title: Neet ug 2026 nmc mbbs seat matrix colleges new medical admission updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Doctor
  • MBBS
  • medical students
  • NEET

संबंधित बातम्या

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!
1

NEET PG 2026: नीट परीक्षेत वीज गेली किंवा कॉम्प्युटर हँग झाला तर काय कराल? NBEMS ने दिली महत्त्वाची माहिती!

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!
2

NEET PG 2026 परीक्षेपूर्वी पेपर झाला लीक? NBEMS कडून विद्यार्थ्यांसाठी कडक इशारा!

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
3

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या MBBS कोर्सचा ५.५ वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि वर्षनिहाय माहिती..
4

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहताय? जाणून घ्या MBBS कोर्सचा ५.५ वर्षांचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि वर्षनिहाय माहिती..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.