फोटो सौजन्य- सोशल मीडिया
ICMAI June 2026 Results: इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) कडून इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इन्स्टिट्यूटने जून २०२६ सत्रासाठी (टर्म) सिलॅबस २०२२ अंतर्गत झालेल्या परीक्षांचा निकाल व तात्पुरती (प्रोव्हिजनल) गुणवत्तेची यादी (मेरिट लिस्ट) जारी केली आहे. आता यामध्ये कोणत्या शहरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
या वर्षी ७,८८५ उमेदवारांनी इंटरमिजिएट कोर्स पूर्ण केला आहे, तर ४,२२० उमेदवारांनी फायनल परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मेरिट लिस्टमध्ये टॉप ५ रँक मिळवणाऱ्या उमेदवारांची नावे आणि त्यांच्या शहरांची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
इंटरमिजिएट परीक्षेत सुरतच्या रौनक जैन यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. टॉप ५ विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
| रँक | नाव | शहर |
|---|---|---|
| 1 | रौनक जैन | सुरत |
| 2 | मोहित दास | विशाखापट्टणम |
| 3 | कांताला प्रशांत रेड्डी | हैदराबाद |
| 4 | हर्ष सुनीत जैन | सुरत |
| 5 | तारक साईं राम पी | गुंटूर |
NEET UG 2026 च्या पहिल्या फेरीच्या समुपदेशनाची नोंदणी सुरू; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर!
फायनल परीक्षेत गुंटूरच्या मोक्षित वामसी कृष्णा मट्टुपल्ली यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे, तर नवी मुंबईच्या राहुल कैलास भोईर यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. फायनल परीक्षेतील टॉप ५ विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
| रँक | नाव | शहर |
| १ | मोक्षित वामसी कृष्ण मट्टुपल्ली | गुंटूर |
| २ | राहुल कैलास भोईर | नवी मुंबई |
| ३ | वन्नेमरेड्डी हेमंथ | गुंटूर |
| ४ | गुरकीरत सिंह भंगू | भिलाई |
| ५ | चोरावाला प्रथमकुमार निलेशकुमार | सुरत |
या परीक्षेच्या जाहीर करण्यात आलेल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टनुसार, देशभरातील विविध शहरांमधून विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यामध्ये विशेषतः सुरत आणि गुंटूर या शहरांमधून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट आणि फायनल परीक्षेत टॉप रँक्समध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. याशिवाय नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमधील उमेदवारांनीही चमकदार कामगिरी केली आहे.






